Join us

लग्नानंतर सोनम कपूर करणार बॉलिवूडला बाय-बाय ? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 10:36 IST

सध्या बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात आहेत. रोज नवीन नवीन गोष्टीचा खुलासा सोनमच्या लग्नाबाबत केला जातो. नुकताच्या ...

सध्या बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात आहेत. रोज नवीन नवीन गोष्टीचा खुलासा सोनमच्या लग्नाबाबत केला जातो. नुकताच्या आलेल्या रिपोर्टनुसार सोनम कपूर लग्नानंतर लंडनला शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात होते. या माहिती समोर आल्यानंतर सोनम कपूर बॉलिवूडला रामराम करणार का असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार सोनमचा असा कोणातच प्लॉन नाही आहे. लग्नानंतर देखील सोनम चित्रपटात काम करणार आहे. ऐवढेच नाही तर लग्नाच्या काही दिवसांनंतर ती कामावर परतणार आहे आणि तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'चे प्रमोशन करणार आहे.  जूनमध्ये सोनमचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे.वीरे दी वेडींग शिवाय सोनम कपूर संजय दत्तच्या बायोपिकमध्ये सुद्धा दिसणार आहे. याशिवाय ती अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'द जोया फॅक्टर' या चित्रपटात सलमान खानच्या अपोझिट दिसणार आहे तसेच विधु विनोद चोप्राच्या 'एक लडका को देखा तो ऐसा लगा' चित्रपटात ती पहिल्यांदा अनिल कपूरसोबत दिसणार आहे. सोनमच्या लग्नाला सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 150 लोक हे लग्न अटेंड करू शकतात. ऐवढ्या लोकांना स्वित्झर्लंडमध्ये घेऊन जाणं कठिण झाले असते. दोघांच्या कुटुंबीयांमधील वृद्ध व्यक्तिना तिकडे घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मुंबईत लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. कपूर कुटुंब जोरात लग्नाच्या तयारीला लागले आहेत. लग्न वांद्रे किंवा जुहूच्या हॉटेलमध्ये होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि करीना कपूरला लग्नाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.