Join us

सोनम कपूरला ‘या’ अभिनेत्यासारखा हवाय पती, आनंदमध्ये दिसतेय तिला त्याची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 16:21 IST

अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्ली येथील बिझनेसमॅन आनंद आहुजा येत्या ८ मे रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि ...

अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्ली येथील बिझनेसमॅन आनंद आहुजा येत्या ८ मे रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि आहुजा परिवारानेच काही दिवसांपूर्वी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र सोनमने २०१३ मध्ये याबाबतचा खुलासा केला होता की, तिला अखेर कसा पती हवाय? सोनमने एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना म्हटले होते की, ‘रांझणा’ चित्रपटातील को-स्टार अभिनेता धनुषसारख्या व्यक्तीबरोबरच मला लग्न करायचे आहे. सोनमने म्हटले होते की, ‘धनुषसारखे कोणीच नाही. तो खूप इनोसेंट आणि स्वीट आहे. मी धनुषसारख्याच एखाद्या व्यक्तीवर प्रेम करू इच्छिते. मला असे वाटते की, मुंबईत माझ्या पसंतीचा एकही मुलगा नाही. त्यामुळे मला माझा जोडीदार शोधण्यासाठी तामिळनाडूला जावे लागेल. माझ्या वडिलांनी धनुषबद्दल बोलताना म्हटले होते की, त्याने ‘रांझणा’मध्ये खूपच चांगले काम आणि अभिनय केला आहे. जेव्हा मी पापा अनिल कपूर यांना माझ्याबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की, तूदेखील चांगला अभिनय केला आहेस. त्यानंतर पुन्हा त्यांनी धनुषबद्दल बोलण्यास सुरुवात केली. सोनम कपूर आणि धनुषने ‘रांझणा’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. दरम्यान, सोनम आनंदसोबत लग्न करीत असल्याने खूप आनंदी आणि उत्साही आहे. कदाचित तिला आनंदमध्ये धनुषप्रमाणे पती दिसत असावा. असे म्हटले जात आहे की, सोनम कपूरच्या लग्नात परिवारातील काही मंडळी आणि मित्रमंडळीच सहभागी होणार आहे. त्यानंतर रिस्पेशनमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोनम आणि आनंदचे लग्न रीतिरिवाजानुसार पार पडणार आहे. लग्नाचा कार्यक्रम बांद्रास्थित रॉकडेल येथे पार पडणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी रिसेप्शन असणार आहे.