लग्नानंतर सोनम कपूर सुरू करणार नवी इनिंग, वाचा सविस्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:11 IST
लग्नानंतर सोनम कपूर अभिनय सोडणार नाही, हे सर्वांनाच ठाऊक होते. झाले ही तसेच. मी लग्नानंतरही चित्रपटात काम करत राहिल, ...
लग्नानंतर सोनम कपूर सुरू करणार नवी इनिंग, वाचा सविस्तर!!
लग्नानंतर सोनम कपूर अभिनय सोडणार नाही, हे सर्वांनाच ठाऊक होते. झाले ही तसेच. मी लग्नानंतरही चित्रपटात काम करत राहिल, हे सोनमने कधीचेच स्पष्ट केले आणि आता लग्नानंतर सोनम एक नवी इनिंग सुरु करतेय. होय, ऐकता ते खरे आहे. अभिनयासोबतचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय सोनमने घेतला आहे. केवळ निर्णयचं नाही तर आपल्या पहिल्या डायरोक्टोरियल प्रोजेक्टवर तिने कामही सुरु केले आहे. आपल्या पहिल्या प्रोजेक्टसाठी कुणाला साईन करायचे, हेही तिने ठरवले आहे. किमान तिच्या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, याबद्दल तिच्या मनात कुठलीही शंका नाही. ताजी बातमी खरी मानाल तर सोनम आपल्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये स्वरा भास्करला कास्ट करणार आहे. स्वराच्या कामामुळे मी कमालीची प्रभावित आहे. ALSO READ : आपल्या लग्नातील मित्रांच्या अशा वागण्याने संतापली सोनम कपूर! बोलून दाखवली नाराजी!तिच्यासाठी मी अनेक कथा लिहिल्या आहेत आणि सगळे काही जुळून आले तर लवकरच तिला व स्वराला प्रेक्षक पुन्हा एकदा एकत्र पाहू शकतील़, असे सोनमने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले. केवळ सोनमचं नाही तर स्वरानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोनमचे व्यक्तिमत्त्व अफलातून आहे. तिच्याकडे एक उत्तम स्क्रिप्ट आहे. मलाही ही स्क्रिप्ट आवडली आहे. सोनम एक उत्तम अभिनेत्री आहेच. भविष्यात एक उत्तम दिग्दर्शिका म्हणूनही ती स्वत:ला सिद्ध करेल, याची मला खात्री आहे. कारण तिच्याकडे कल्पनांचा खजिना आहे. तिची कल्पनाशक्ती अफाट आहे, असे स्वरा अलीकडे म्हणाली. तिच्यासोबत काम सुरू करण्याच्या त्या दिवसाची मी आतुरतेने प्रतीक्षा करतेय, असेही ती म्हणाली.सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांची मुख्य भूमिका असलेला ‘वीरे दी वेडिंग’हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनमला एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीमधील तिच्या खास मैत्रिणींची नाव विचारण्यात आली होती. यावर करिनाने जॅकलिन फर्नांडिस, करिना कपूर आणि स्वरा भास्कर या अभिनेत्रींची नावे सांगितली होती. एकंदर काय तर सोनमचे दिग्दर्शन क्षेत्रात येणे निश्चित आहे. आता या क्षेत्रात ती किती यशस्वी होते, ते बघूच़ तोपर्यंत तरी सोनमला शुभेच्छा देऊ यात.