Join us  

सोनम कपूरच्या हातातल्या बॅगची किंमत जाणून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 6:00 AM

सोनम कपूर नेहमीच तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते.अनेक तरुण मुलींची सोनम फॅशन आयकॉन आहे.सोनमने नुकचेत एक फोटो शूट केले आहे.

ठळक मुद्देअनेक तरुण मुलींची सोनम फॅशन आयकॉन आहेसोनमने नुकतेच एक फोटो शूट केले आहे

सोनम कपूर नेहमीच तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते.अनेक तरुण मुलींची सोनम फॅशन आयकॉन आहे.सोनमने नुकतेच एक फोटो शूट केले आहे. ज्यात तिने व्हाईल कलरचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यात तिच्या हातात एक छोटीशी बॅग दिसतेय. या बॅगची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या बॅगची किंमत 2990 पाऊंड आहे. भारतीय किंमतीनुसार 2 लाख 43 हजार इतकी आहे.

लग्नानंतर सोनम 'वीरे दी वेडिंग'मध्ये दिसली होती. त्यानंतर लवकरच ती  दुलकर सलमान 'द जोया फॅक्टर' सिनेमात दिसणार आहे. हा थरारपट असून यात सोनम पोलिसाच्या भूमिका दिसणार असल्याचे समजते आहे. हा सिनेमा एका पुस्तकावर आधारीत आहे.

या सिनेमाबाबत सोनम म्हणाली की, 'प्रत्येकाला वाटते आहे की मी झोयाची भूमिका करावी, हे खूप मजेशीर होते. मला हलकीफुलकी भूमिका करायची आहे. मात्र इतरांना वाटत आहे की ड्रामा असणारा रोल करावा. खुबसूरतनंतर मी हलकाफुलक्या सिनेमात काम करते आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. माझ्यासोबत दुलकर सलमान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.' विधु विनोद चोप्राचा आगामी सिनेमा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मध्ये सोनम पहिल्यांदाच तिचे वडील अनिल कपूर यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. कुटुंबासोबत काम करणे नेहमीच खूप मजेशीर असल्याचे सोनम म्हणाली.

टॅग्स :सोनम कपूरदुलकर सलमान