Join us  

सोनम कपूरला एअरलाइन्सने दुसऱ्यांदा लावला चुना, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:45 PM

सोनम कपूरने सोशल मीडियावर एअरलाइन्सविरोधात व्यक्त केलेल्या संतापाची पोस्ट व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच केलेले ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये तिने ब्रिटिश एअरवेजबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर एका महिन्यात दोनदा माझे सामान हरवल्याचा आरोप सोनमने केला आहे. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. आता परत मी येथून प्रवास करणार नसल्याचे देखील सोनमने म्हटलंय. यानंतर लगेच यावर ब्रिटिश एअरवेजने स्पष्टीकरण दिले आहे.

सोनम कपूरने ट्विट केले की, या महिन्यात ही तिसरी वेळ होती ब्रिटिश एअरवेजने ट्रॅव्हेल करण्याची आणि या एअरवेजने प्रवास करताना माझे दोनदा सामान गहाळ झाले. यातून मी चांगलाच धडा घेतला आहे. आतापासून मी कधीच ब्रिटिश एअरवेजने प्रवास करणार नाही.

सोनमचे हे ट्विट वाचल्यानंतर एअरलाईन कंपनीने रिप्लाय देत सांगितले की, तुमचे सामान मिळण्यासाठी तुम्हाला उशीर लागला यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो. परंतु ज्यावेळी तुम्ही विमानतळावर माहिती दिली होती त्यावेळी तुम्हाला एखादा ट्रॅकिंग कोड देण्यात आला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

ब्रिटिश एअरवेजच्या ट्विटला रिट्विट करताना सोनम म्हणते, हे सर्व करण्यात आले आहे मात्र हे खूप असुविधाजनक आहे. तुम्ही यावर लक्ष दिले पाहिजे कारण यामुळे तुमची खराब सर्विस दिसून येते.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सोनम कपूर लवकरच वीरे दी वेडिंग २मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सोनम कपूर