सोनाक्षी बनणार पत्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:26 IST
सोनाक्षी सिन्हाचे या वर्षी अकिरा आणि फोर्स २ असे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच तिने काहीच दिवसांपूर्वी नमस्ते ...
सोनाक्षी बनणार पत्रकार
सोनाक्षी सिन्हाचे या वर्षी अकिरा आणि फोर्स २ असे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच तिने काहीच दिवसांपूर्वी नमस्ते इंग्लंड आणि इत्फाकचा रिमेक असे दोन चित्रपट साईन केले आहेत आणि आता तिने नूर हा एक चित्रपट साईन केला आहे. यंदाचे वर्ष सोनाक्षीसाठी खूप चांगले आहे असे म्हणायला हरकत नाही. नूर हा चित्रपट पाकिस्तानी लेखिका सबा इम्तियाज यांच्या कराची यू आर किलिंग मी या कादंबरीवर आधारित आहे. ती नूरच्या चित्रपटाचे चित्रीकरण जुलैमध्ये सुरू करणार आहे. सोनाक्षी या चित्रपटात पारंपरिक आणि मॉर्डन अशा दोन्ही लूकमध्ये दिसणार आहे. तिने या दोन्ही लुकचे फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत.