Join us  

सलमान खानच्या सांगण्यावरून सोनाक्षी सिन्हाने केले हे काम, तिनेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 6:07 PM

सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या बाबतीतली एक खास गोष्ट नुकतीच सांगितली आहे.

ठळक मुद्दे सलमान मला त्याच्या आगामी चित्रपटात संधी देणार असून त्यासाठी त्याने मला वजन कमी करण्यासाठी सांगितले होते.

सलमान खानने दबंग या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये लाँच केले. सोनाक्षीने खूपच कमी कालावधीत आज बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. तिने आजवर लुटेरा, रावडी राठोड, हॉलिडे, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचा कलंक हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता खानदानी शफाखाना या चित्रपटात ती झळकणार असून तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

खानदानी शफाखाना या चित्रपटाची कथा खूपच वेगळी असून या चित्रपटात आपल्या समाजात टाबू मानल्या जाणाऱ्या सेक्स या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचे सोनाक्षी सध्या जोरदार प्रमोशन करत असून या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाविषयी सांगितले आहे. 

या कार्यक्रमात दबंग या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत सोनाक्षीने सांगितले की, सलमान मला त्याच्या आगामी चित्रपटात संधी देणार असून त्यासाठी त्याने मला वजन कमी करण्यासाठी सांगितले होते. सलमानने मला ही गोष्ट कशाप्रकारे सांगितले हे देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. सलमानने मला सांगितले होते की, तू आज मला ट्रीट देणार आहेस... कारण मी तुला एक गुड न्यूज देत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण त्यावेळी माझ्या पर्समध्ये केवळ तीन हजार रुपये होते. त्यामुळे त्याला कुठेही बाहेर खायला कसे घेऊन जायचे असा प्रश्न मला पडला होता. ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.

सोनाक्षीला दबंग या तिच्या पहिल्याच चित्रपटाने स्टार बनवले. या चित्रपटातील तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची देखील चर्चा झाली होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर यायल्या आल्या. आता ती दबंग या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. या चित्रपटात देखील चुलबूल पांडे आणि रज्जो यांच्या केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासलमान खान