Join us  

सोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 3:24 PM

 कौटुंबिक चित्रपट करणारी सोनाक्षी कायम सेक्स कॉमेडी चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवत आलीय. त्यामुळेच ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट तिने स्वीकारताच  अनेकांच्या भुवया उंचावल्या.

ठळक मुद्दे‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात सोनाक्षी बेबी बेदीची व्यक्तिरेखा साकारते आहे.

‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रथमच ‘खानदानी शफाखाना’ या सेक्स कॉमेडी सिनेमात दिसणार आहे.  कौटुंबिक चित्रपट करणारी सोनाक्षी कायम सेक्स कॉमेडी चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवत आलीय. त्यामुळेच ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट तिने स्वीकारताच  अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनाक्षीने हा चित्रपट स्वीकारण्यामागचे कारण सांगितले. 

ती म्हणाली की, ‘सेक्स सारखा विषय आणि यावरचा चित्रपट मी कसा करेल, असा प्रश्न मला पडला होता. कारण मी आत्तापर्यंत केवळ आणि केवळ कौटुंबिक चित्रपट केले होते. मम्मी पापा काय म्हणतील, याचीही चिंता मला होती. पण मी स्क्रिप्ट वाचली आणि हा चित्रपट मी करायलाच हवा, असे मला वाटले. भारतात आजही सेक्स या विषयावर बोलताना लोक कचरतात. सर्दी-ताप आला तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. पण सेक्सविषयक आजारांसाठी डॉक्टरकडे जाण्यात इतका संकोच का?  असा प्रश्न मला पडला. या विषयावर जनजागृती करायची तर हा चित्रपट करायला हवा, असे मला वाटले.’

कुटुंब एकत्र बसून हा चित्रपट पाहू शकत का? असे विचारले असता सोनाक्षीने होकारार्थी उत्तर दिले. होय, मोठ्यांसोबत लहानही हा चित्रपट पाहू शकतात. हा पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट आहे. दिग्दर्शक शिल्पी दासगुप्ता यांनी अतिशय संवेदनशीलपणे हा विषय हाताळला आहे, असे तिने सांगितले.‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटात सोनाक्षी बेबी बेदीची व्यक्तिरेखा साकारते आहे. बेबी बेदी तिच्या मामाचा ‘खानदानी शफाखाना’ चालवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. याठिकाणी लोक त्यांच्या सेक्ससंबंधित समस्यांवर उपचार घेण्यासाठी येतात. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा