Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 14 व्या वर्षी या अभिनेत्रीवर झाला होता बलात्कार, आज महिलांसाठी चालवते संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 18:13 IST

या अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे.

ठळक मुद्देसोमी पाकिस्तानात लहानाची मोठी झाली. ती पाच वर्षांची असताना तिच्या कूकने तिच्यावर तीनदा लैंगिक अत्याचार केला होता तर ती नऊ वर्षांची असताना सुरक्षारक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

सोमी अली मुळची पाकिस्तानची. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ती ओळखली जाते. सोमीची आई इराकी आणि वडील पाकिस्तानी आहेत. १२ वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करियर करायचे होते. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते.

सोमीने एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती 14 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला होता असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. ती पाकिस्तानात लहानाची मोठी झाली. ती पाच वर्षांची असताना तिच्या कूकने तिच्यावर तीनदा लैंगिक अत्याचार केला होता तर ती नऊ वर्षांची असताना सुरक्षारक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. एवढेच नाही तर ती 14 वर्षांची असताना अमेरिकेतील एका पार्कमध्ये एका 17 वर्षांच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या आयुष्यात घडलेल्या या घटनांमुळेच तिनेच नो मोअर टीअर्स ही संस्था स्थापन केली. 

सलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. तिथे तिने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नालिझम केले. यादरम्यान डॉक्युमेंट्री बनवण्यात तिला रस वाटू लागला. पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर सोमीने महिलांच्या आयुष्यावर काही लघुपट बनवले. 

२००६ मध्ये सोमीने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली. वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत.

टॅग्स :सोमी अली