रेखा कुणाला म्हणाली, ‘वो आ रहें है’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 17:25 IST
बॉलिवूडच्या अधु-या प्रेम कहाण्यांमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची एक अधुरी कहाणी आहे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये रेखा अमिताभ यांच्याबद्दल ...
रेखा कुणाला म्हणाली, ‘वो आ रहें है’?
बॉलिवूडच्या अधु-या प्रेम कहाण्यांमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची एक अधुरी कहाणी आहे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये रेखा अमिताभ यांच्याबद्दल अशी काही बोलली, की सगळ्यांचीच कळी खुलली. या इव्हेंटमध्ये रेखाने फोटोग्राफर्सला मस्तपैकी पोझ दिली. पण याचदरम्यान ती जरा घाईत दिसली. फोटोग्राफर्स तिला रोखणार, तोच ‘वो आ रहे हैं...’,असे सांगून रेखा घाईघाईत निघून गेली. ती कुणाबद्दल बोलतेय, हे कळायच्या आधीच तिथे अमिताभ बच्चन येऊन पाहोचले. रेखा कुणाबद्दल बोलली, हे मग सगळ्यांनाच कळून चुकले. रेखा- अमिताभ यांची प्रेम कहाणी अधुरी असली तरी आजही बॉलिवूडमध्ये या नात्याकडे प्रचंड आदराने बघितले जाते. रेखा व अमिताभ यांच्या नात्यामुळे रेखा व जया यांच्या नात्यात प्रचंड कटुता आली होती. पण आता ती संपलीय. गत काळात रेखा व जया बच्चन अनेक इव्हेंटमध्ये परस्परांशी प्रेमाने भेटताना दिसल्या.