हेमा मालिनी व धर्मेन्द्र यांचे काही युनिक फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST
हेमा मालिनी अभिनेते धर्मेन्द्र यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. हेमा मालिनी व धर्मेन्द्र यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. या चित्रपटांच्या सेटवर हेमासोबत रोमान्स करण्यासाठी धर्मेन्द्र यांनी एक कमालीची युक्ती केली होती. तर कॅमेरामॅनला लाच देण्याची.
हेमा मालिनी व धर्मेन्द्र यांचे काही युनिक फोटो!
हेमा मालिनी अभिनेते धर्मेन्द्र यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. हेमा मालिनी व धर्मेन्द्र यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. या चित्रपटांच्या सेटवर हेमासोबत रोमान्स करण्यासाठी धर्मेन्द्र यांनी एक कमालीची युक्ती केली होती. तर कॅमेरामॅनला लाच देण्याची.चित्रपटात येण्यापूर्वी धर्मेन्द्र यांचा विवाह झाला होता. पण हेमा मालिनी त्यांचे पहिले प्रेम होते. हेमा व धर्मेन्द्र यांच्या विवाहाला हेमा यांच्या कुटुंबाचा प्रखर विरोध होता. पंजाबी कुुटुंबातील विवाहित धर्मेन्द्र त्यांना जावई म्हणून नको होते. धर्मेन्द्र व हेमा यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागल्यावर कुटुंबीयांनी हेमा यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. शूटींगबाहेर धर्मेन्द्र हेमांना भेटू शकत नव्हते. तेव्हा कॅमेरामॅनला ते पटवायचे. मग काय, हेमासोबतच्या धर्मेन्द्र यांच्या सीनचे पाठोपाठ रिटेक व्हसयचे. सीन रिटेक करायचा असला की धर्मेन्द्रचा एक खास कोड वर्ड होता. तो आपल्या कानाला हात लावायचा. कॅमेरामॅनला कळायचे आणि मग हेमा व धर्मेन्द्र यांचा सीनचे रिटेक व्हायचे.