Join us  

सामान खरेदी करण्यापूर्वी त्याची किंमत पाहते सोहा अली खानची मुलगी, कुणाल खेमूने शेअर केला Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 8:10 PM

अभिनेता कुणाल खेमूने इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगी इनायाचा फोटो शेअर केला आहे ज्यात ती सामानाची किंमत पाहताना दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूने जानेवारी 2015मध्ये अभिनेत्री सोहा अली खानसोबत लग्न केले आणि 2017मध्ये सोहाने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव इनाया आहे. आता ती दोन वर्षांची असून समजूतदारही झाली आहे. याचा प्रत्यय नुकताच कुणाल खेमूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोतून आला. या फोटोत इनाया सामानाची किंमत पाहताना दिसते आहे.

कुणालने इनायाचा फोटो शेअर करीत लिहिले की, कारण आम्हाला माहित आहे की आम्हाला काय आवडते आणि त्याची योग्य किंमत काय असली पाहिजे. 

इनाया भाऊ तैमूर अली खान एवढीच क्युट आहे. कित्येक वेळा त्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

याशिवाय इनाया तिच्या ग्रे ग्रीन डोळ्यांमुळे चर्चेत असते. एका वेबसाईटशी चर्चा करताना कुणालने इनायाच्या डोळ्यांच्या रंगाबद्दल सांगितले की, सोहा आणि माझ्या डोळ्यांचा रंग डार्क आहे व माझ्या आजीच्या डोळ्याचा रंग लाइट आहे. त्यामुळे इनायाच्या डोळ्यांचा रंग तसा आहे.

टॅग्स :कुणाल खेमूसोहा अली खानतैमुर