Join us  

सोहा अली खानच्या मुलीचा जुना व्हिडिओ झाला व्हायरल, म्हणतेय गायत्री मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 6:00 AM

सोहा अली खानची मुलगी इनायाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती चक्क गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे.

ठळक मुद्देइनायाच्या बोबड्या आवाजात हा गायत्री मंत्र नेटिझन्सना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ आताचा नसून रक्षाबंधनचा आहे. या व्हिडिओत कुणाल खेमूची बहीण त्याला राखी बांधून ओवाळताना दिसत आहे तर इनाया गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे काहीही महत्त्वाचे कारण असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावे असे सगळ्यांना सरकारने सांगितले आहे. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन सेलिब्रेटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. सध्या सगळेच सेलिब्रेटी, सामान्य लोक सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. 

सोहा अली खानची मुलगी इनायाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती चक्क गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे. इनायाच्या बोबड्या आवाजात हा गायत्री मंत्र नेटिझन्सना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ आताचा नसून रक्षाबंधनचा आहे. या व्हिडिओत कुणाल खेमूची बहीण त्याला राखी बांधून ओवाळताना दिसत आहे तर इनाया गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याच व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

सोहा अली खानची मुलगी इनाया अतिशय गोंडस दिसत असून तिचे फोटो ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. ती क्यूट असल्याचे सोहाच्या सगळ्याच फॅन्सनचे म्हणणे आहे. इनायाला अनेकवेळा तिच्या आई वडिलांसोबत सार्वजनिक ठिकाणी देखील पाहायला मिळते. इनाया ही अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांची मुलगी असून सोशल मीडियावर सध्या तिच्या क्यूटनेसची चांगलीच चर्चा असते.

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूने जानेवारी 2015मध्ये अभिनेत्री सोहा अली खानसोबत लग्न केले आणि 2017मध्ये इनायाचा जन्म झाला. इनाया भाऊ तैमूर अली खान एवढीच क्युट आहे. कित्येक वेळा त्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

टॅग्स :सोहा अली खान