Join us

'३१ ऑक्टोबर' मध्ये सोहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2016 13:21 IST

सोहा अली खानच्या आगामी चित्रपट '३१ ऑक्टोबर' चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. यात ती एका पंजाबी महिलेच्या रूपात ...

सोहा अली खानच्या आगामी चित्रपट '३१ ऑक्टोबर' चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. यात ती एका पंजाबी महिलेच्या रूपात दिसणार आहे. चित्रपटात सोहा, तजिंदर कौर नावाच्या महिलेच्या रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटेन पाटील हे असणार आहेत. या चित्रपटाला लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आले आहे. निर्माता हॅरी सचदेव यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे. १९८४ च्या इंदिरा गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीबद्दल यात चित्रण करण्यात आले आहे. तिच्यासोबत वीर दास असतील. ते देखील एका शीख व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यांचे कुटुंबीय १९८४च्या शीखविरोधी दंगलीमध्ये अडकले होते.