म्हणून रात्री 2 वाजता झालं रोबो 2.0चं शुटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 16:35 IST
‘रोबो’ आणि ‘खिलाडी’ यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला रोबो 2.0 हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं ...
म्हणून रात्री 2 वाजता झालं रोबो 2.0चं शुटिंग
‘रोबो’ आणि ‘खिलाडी’ यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला रोबो 2.0 हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शुटिंग चेन्नईच्या फोरम विजया मॉलमध्ये करण्यात आलं. यासाठी सुपरस्टार रजनीकांत, खिलाडी अक्षय कुमार यांच्यासह संपूर्ण सिनेमाची टीम रात्री उशिरा चेन्नईच्या या मॉलमध्ये पोहचली. 2 वाजता या शुटिंगला सुरुवात होऊन सकाळी 6 वाजता ते शुटिंग संपलं..सुरुवातीला हा सीन लोकांच्या वर्दळीत चित्रीत करण्यात येणार होता. मात्र सुपरस्टार रजनी आणि खिलाडी अक्षयची लोकप्रियता पाहता हा सीन रात्रीच्या वेळी चित्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सिनेमाचे दिग्दर्शक शंकर यांनी विशेष परवानगी घेतली होती.