Join us  

याला म्हणतात स्वाभिमान, सलमानच्या हिरोइनने आजपर्यंत कधीच मागितले नाही त्याच्याकडे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 6:00 AM

सलमान खानची साथ लाभल्यानंतरही स्नेहा उलाल हवे तसे यश मिळाले नाही. अखेरची 2015 मध्ये आलेल्या 'बेजुबान इश्क' या सिनेमात झळकली होती. मात्र त्यानंतर सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.

२००५ साली 'लकी नो टाईम फॉर लव्ह' चित्रपटातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली. ही लकी गर्ल सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी देखील आजही ती प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. तिचा निरागस चेहरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिच्या लुक्सची तुलना नेहमीच ऐश्वर्या राय बच्चनसोबत होते.

लकी सिनेमातून सलमाननेच तिला लॉन्च केले होते. सलमान खानची साथ लाभल्यानंतरही स्नेहा उलाल हवे तसे यश मिळाले नाही. अखेरची 2015 मध्ये आलेल्या 'बेजुबान इश्क' या सिनेमात झळकली होती. मात्र त्यानंतर सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.

स्नेहाने तीन वर्षे एका गंभीर आजाराशी लढा दिला.एका मुलाखतीत स्नेहाने सांगितले होते की, ती ऑटोइम्यून डिसऑर्डरने पीडित असून हा आजार रक्ताशी संबंधित असतो. या आजारामुळे ती अतिशय अशक्त झाली होती, ती अर्धा तासदेखील स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. या आजारामुळे ती दीर्घकाळ सिनेमांपासून दूर राहिली.

तिला चालणे, डान्स करणे आणि सततच्या शूटिंगमुळे थकवा येऊ लागला होता. त्यानंतर  शूटिंगपासून ब्रेक घेऊन योग्य उपचार घेतले. काम करत असताना दर दुस-या दिवशी ती आजारी पडायची. आता ती एक फिट आहे. कुठल्याही प्रकराचा त्रास तिला होत नाही. कोणत्याही अडथळा न आणता ती काम करू शकते. 

स्नेहाने सांगितले, जेव्हा 'लकी' सिनेमा आला तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होती. याच काळात सिनेमामुळे माझे शिक्षणही अपूर्ण राहिले होते.पण शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मी साऊथमध्ये बिझी झाले. तेथे काम जास्त होते. त्यामुळे बॉलिवूडपासून दूर राहणेच पसंत केले.

सिनेमांमध्ये कमबॅकविषयी स्नेहा म्हणाली, ''मैं इंडस्ट्री सोडली नव्हती. फक्त आजारपणामुळे मला थोड्या दिवसांचा ब्रेक घ्यावा लागला. त्यामुळे कमबॅकचा प्रश्नच उद्भवत नाही.

टॅग्स :सलमान खान