Join us  

'बहिणीच्या नवऱ्यासोबत होते संबंध'; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा पूर्व पत्नीबाबत खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 12:50 PM

शिल्पा शेट्टीसोबत लग्न करण्यापूर्वी राज कुंद्राने त्याची पहिली पत्नी कविताला घटस्फोट दिला होता.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. राज कुंद्राचे दुसरे लग्न आहे. शिल्पा शेट्टीसोबत लग्न करण्यापूर्वी राज कुंद्राने त्याची पहिली पत्नी कविताला घटस्फोट दिला होता. याबद्दल राज आणि शिल्पाने मौन बाळगले होते. मात्र कविताने केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. तिच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज कुंद्राने घटस्फोट घेण्यामागचे कारणही सांगितले.

कविताने दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत राज सोबत झालेल्या घटस्फोटासाठी शिल्पा शेट्टी कारणीभूत असल्याचे म्हटले होते. यात ती म्हणाली होती की, शिल्पाने माझ्या संसारात ढवळाढवळ केली. राज विवाहित पुरूष असतानाही तिने त्याच्यासोबत जवळीक वाढवली. तिच्यामुळेच आमचा सुखी संसार मोडला.

दरम्यान तिच्या या आरोपांवर आता राज कुंद्राने प्रत्युत्तर दिले आहे. आतापर्यंत तो शांत होता ते फक्त शिल्पामुळे. कारण शिल्पाने त्याला यावर बोलण्यास मनाई केली होती असे त्याने सांगितले.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार राज कुंद्राने कवितांवरील आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला की कविता खूप विक्षिप्त आहे. माझी फॅमिली माझ्यासाठी सर्वकाही आहे. मात्र ती माझ्या कुटुंबाला त्रास देत होती. माझे आई-वडिल, बहिण आणि तिचा पती आम्ही युरोपमध्ये असताना एकाच घरात राहात होतो. त्यावेळी तिने माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत खूपच जवळीक वाढवली होती. ती त्याच्यासोबतच जास्त वेळ घालवायची. मला सतत टाळायची. मी तिच्याशी या प्रकरणावर जेव्हा कधी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या ड्रायव्हरने देखील त्या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले होते.”

पुढे त्याने सांगितले की, या प्रकरणामुळे माझ्या बहिणीने युकेतील घर सोडले व ती भारतात परतली. भारतात आल्यानंतरही दोघांमध्ये काहीतरी सुरुच होते. यादरम्यान बहिणीला तिच्या पतीचा दुसरा फोन मिळाला आणि त्यामधील मेसेज पाहून सर्व खुलासा झाला. माझ्या पत्नीचे आणि बहिणीच्या पतीचे संबंध होते. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील होते मात्र दोघांनी हे नाते स्वीकारायला नकार दिला. शेवटी वैतागून मी कविताला घटस्फोट दिला. या प्रकरणाशी शिल्पाचा काहीही संबंध नाही. ती उगाचच प्रसिद्धीसाठी तिला यामध्ये खेचत आहे. इतके दिवस मी शांत होतो कारण याबाबत मी काहीही बोलू नये अशी शिल्पाची इच्छा होती. 

राज कुंद्रा म्हणाला की, त्याचे कुटुंब त्याचे पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे मी शांत राहणे पसंत केले होते. मात्र आता ती माझ्या कुटुंबातील सदस्यांवर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे मी तिच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. राज कुंद्राने केलेल्या प्रत्युत्तरानंतर कविताने अद्याप काहीही उत्तर दिलेले नाही.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा