Join us  

निर्माते संदीप सिंग या चित्रपटासाठी बनले गायक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 8:19 PM

निर्मात्याने चित्रपटामध्ये आपल्या विविध कलांचे प्रदर्शन केले आहे असे क्वचितच घडते.

निर्मात्याने चित्रपटामध्ये आपल्या विविध कलांचे प्रदर्शन केले आहे असे क्वचितच घडते. 'पीएम नरेंद्र मोदी' हा असा एक खास चित्रपट आहे जिथे निर्माता हा फक्त क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि गायकच नाही, तर चित्रपटाची कथा सुद्धा त्यालाच सुचली आहे. हे निर्माते दुसरे तिसरे कोणी नसून संदीप सिंग आहेत. 

बऱ्याच जणांना माहित नसेल पण रॅप गाणे 'नमो नमो' हे सिंग यांनीच गायले आहे आणि या रॅपचे बोल पॅरी जी यांनी लिहिले आहेत. हे रॅप म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि ते आपल्या १.४ करोड लोकसंख्येच्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी करत असलेल्या अविरत परिश्रमांना एक प्रकारची मानवंदनाच आहे. याबद्दल निर्माते संदीप सिंग म्हणतात, "मला या चित्रपटाशी खूप जिव्हाळा आहे. म्हणूनच मला त्यात एक वैयक्तिक छटा आणायची होती. मग आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी असलेल्या व्यक्तीविषयी रॅप म्हणणे, याहून चांगले काय असू शकते. हे खूप इंटरेस्टिंग गाणे आहे आणि मला आशा आहे की लोकांना ते आवडेल" या गाण्याचे संगीत दिग्दर्शक हितेश मोडक आहेत ज्यांनी स्वतः गाण्याचे प्रोग्रामिंग देखील केले आहे. संदीप सिंग यांनी ते गायले असून रॅप पॅरी जी यांनी लिहिले आहे. उमंग कुमार यांनी दिग्दर्शित केलेला 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट नरेंद्र मोदींच्या एका छोट्या सुरुवातीपासून ते पंतप्रधान बनेपर्यंतच्या प्रवासाचे दर्शन घडवणार आहे. निर्माते, क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि पटकथाकार संदीप सिंग, निर्मिती सुरेश ओबेरॉय आणि आनंद पंडित यांची, तसेच चरित्रपट बनवण्यात हातखंडा असणारे ओमंग कुमार यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट येत्या ५ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदी