Join us  

Shalmali Kholgade tie knot : सिंगर शाल्मली खोलगडेनं गुपचूप बांधली लग्नगाठ, हटके वरमाला एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:34 PM

Shalmali Kholgade tie knot : शाल्मली खोलगडेनं लग्नाची भणकही लागू न देता अगदी गुपचूप लग्नगाठ बांधली. या लग्नाचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

‘बलम पिचकारी’, ‘लत लग गई’ असे अनेक सुपरहिट गाणी गाणारी लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) विवाह बंधनात अडकली आहे. गेल्या 22 नोव्हेंबरला शाल्मलीने फरहान शेखसोबत (Farhan Sheikh) सात फेरे घेतले. दोघांनीही लग्नाची भणकही लागू न देता अगदी गुपचूप लग्नगाठ बांधली. या लग्नाचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.शाल्मली आणि फरहान दोघंही गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांनाही गाजावाजा नको होता. आधी दोघांचाही  कोर्ट मॅरेज करण्याचा विचार होता. पण नंतर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अगदी पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. लग्नाला मोजून 15 जण उपस्थित होते. लग्नानंतर उद्या 1 डिसेंबरला हे कपल रिसेप्शन देणार असल्याचं कळतंय.

वरमाला ठरली खासशाल्मली व फरहान यांनीएकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. या वरमालेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. होय, फुलांसोबत कपलच्या यादगार क्षणांचे फोटो माळून ही वरमाला बनवण्यात आली होती. लग्नात शाल्मलीने ऑरेंज व व्हाईट कलरची साडी घातली होती. तर फरहानने ऑरेंज कुर्ता व व्हाईट पायजामा घातला होता.

 

शाल्मालीने  परेशान (इशकजादे),  दारू देसी  (कॉकटेल) आणि  बलम पिचकार  (ये जवानी है दिवानी) यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रिअ‍ॅलिटी शो,  इंडियन आयडॉल ज्युनियर  आणि  सूर नवा ध्यास नवा  यांत परीक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली होती. हिंदीव्यतिरिक्त, तिने मराठी, बंगाली, तेलुगू आणि तामिळ अशा अन्य भारतीय भाषांमधूनही गाणी गायली आहेत.

टॅग्स :शाल्मली खोलगडे