Join us  

लग्न, तीन मुलं ,15 वर्षांनंतर घटस्फोट... असं आहे कनिका कपूरचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:00 PM

17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट ते 3 मुलांची सिंगल मदर

ठळक मुद्देकनिका सध्या कोरोना ग्रस्त म्हणून चर्चेत आलीय. 

 बेबी डॉल या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे कळताच तिचे चाहते चिंतीत आहे. याऊलट कनिका ज्या बिल्डींगमध्ये राहते, तिथे जणू भूकंप आला आहे. सध्या कनिका कपूर जाम चर्चेत आहे. तेव्हा जाणून घेऊ या तिच्याबद्दल...

कनिका आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आहे. मात्र इथंपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते़ कारण तिच्या सिंगिंगच्या प्रोफेशनला तिच्या कुटुंबातूनच विरोध होता. एक मुलाखतीत कनिकाने या गोष्टीचा खुलासा केला होता. तिचे  लग्न झाले त्यावेळी तिच्या सासरच्यांना तिचे कोणत्या इव्हेंटमध्ये गाणे अजिबात आवडले नव्हते़ त्यामुळे त्यांनी तिच्या प्रोफेशनला विरोध केला. फक्त छंद म्हणून गाण्याची कला जोपासण्याची मुभा तिला देण्यात आली.

कनिका कपूर उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये लहानाची मोठी झालीय. कनिका लहानपणापासून गायिका व्हायचे होते. पण वयाच्या केवळ1 7 व्या वर्षी 1997 साली तिने एनआरआय बिझनेसमॅन राज चंदोकसोबत लग्न केले. लग्नानंतर कनिका लंडनमध्ये शिफ्ट झाली. लग्नानंतर कनिकाला तीन मुले झालीत. पण कालांतराने हे लग्न मोडले. 2012 मध्ये कनिकाचा पतीसोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कनिका मुंबईला परतली आणि तिने सिंगींग करिअर सुरु केले.

 कनिकाचा पहिले गाणे ‘जुगनी जी’ 2012 मध्ये रिलीज झाले. हे गाणे जबरदस्त लोकप्रिय झाले. पण तिच्या करिअरला ‘बेबी डॉल’ या गाण्याने एका नव्या उंचीवर नेले. या गाण्यामुळे कनिकाला बॉलिवूडची मोठी प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले. ती एका रात्रीत स्टार झाली.

‘रागिनी एमएमएस 2’चे बेबी डॉल हे गाणे सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे तुफान व्हायरल झाले होते. या गाण्यासाठी कनिकाला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या यशानंतर कनिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. हीच कनिका सध्या कोरोना ग्रस्त म्हणून चर्चेत आलीय. कोरोनाबद्दल निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तसेच आदेश न पाळल्याबद्दल तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या