Join us  

घरभाडं भरण्यासाठी पैसे नव्हते मग कॉलसेंटरमध्ये केली नोकरी, ए.आर रहमानने एका रात्रीत बदलले या गायकाचे नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:21 PM

''रहमानने त्यारात्री माझ्याकडून गाणं रेकॉर्ड करुन घेतलं.''

'ये जवानी है दिवानी'मधील बदतमीज दिल गाण असो किंवा कॉकटेल सिनेमातील दारु देसी गाणं, ही गाणे बॉलिवूडच्या सुपरहिट गाण्यांच्या यादीतील लोकांची आवडती गाणी आहेत. या गाण्याचा गायक बेनी दयाल देखील या गाण्यांप्रमाणेच लोकप्रिय आहे.

आज बेनी दयाल त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. बेनीचा जन्म अबू धाबी येथे झाला होता. त्याचे पालक मूळचे केरळचे आहेत. बेनीचे शालेय शिक्षण अबुधाबी इंडियन स्कूलमधून झालं आणि त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून मास्टर इन जर्नलिझम केले. कॉलेजमध्ये बेनी गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा.  कॉलेज आणि बँडचा रॉकस्टार असूनही बेनीला बर्‍याच संगीत दिग्दर्शकांनी रिजेक्ट केले होते.

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत बेनीने आपल्या संघर्षाच्या दिवसांत बद्दल सांगितले होते. बेनी म्हणाला होता की, 'माझ्या वडिलांची ओपन-हार्ट सर्जरी झाली होती. तो युएईहून भारतात परतला. मी त्यांच्याकडे पैसे मागू शकत नव्हतो. माझ्याकडे खोलीचे भाडे भरण्यासाठी पैसेही नव्हते आणि दिवसातून जेवण्यापूरते माझ्याकडे फक्त पैसे होते.

'मी बीपीओ (कॉल सेंटर) मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. मला 11 सप्टेंबर 2006 रोजी त्या बीपीओमध्ये जायचे होते, परंतु कर्मचारी नसल्यामुळे मला 3 सप्टेंबरलाच जॉइन व्हावे लागले. नोकरीच्या तीन दिवसांनंतर एका दिवस अचानक  मला रेहमान सरांच्या ऑफिसमधून फोन आला.  मी फक्त  आशा करीत होतो की हा प्रँक कॉल नसावा. 

रहमानने एकारात्रीत बदलले बेनीचे नशीब बेनीकडून रहमानने त्यारात्री गाणं रेकॉर्ड करुन घेतलं. बेनीने सांगितले होते की,  रमजानच्या वेळी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याने मला बोलावले. मला अरबी आणि स्पॅनिश भाषेत गाणे म्हणावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्याने मला चिनम्मा चिलकम्मा गायला सांगितले. दक्षिणेचे हे लोकप्रिय गाणे हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. बेनी दयाल आपल्या करिअरमध्ये गुजराती, तमिळ, कन्नड, मराठी, बंगाली भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्याच्या खात्यात बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी सामील आहेत. 

टॅग्स :ए. आर. रहमान