Join us  

 ती खोटारडी, दृष्ट...! मेगन मार्कलच्या ‘त्या’ मुलाखतीनंतर सिमी ग्रेवालचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 4:03 PM

नेटक-यांनी ट्रोल केल्यानंतर मागे घेतला दृष्ट (Evil) शब्द

ठळक मुद्दे2016मध्ये प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांची भेट झाली होती. दोन वर्षांनंतर हॅरी आणि मेगन मर्कल यांचे लग्न झाले. या दांपत्याला आर्ची नावाचा मुलगा आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ऑप्रा विन्फ्रेला दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीत मेगन यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत आणि तिच्या या खुलाशांनी खळबळ माजली. लग्नानंतर राजघराण्याचा भाग झाल्यानंतर माझ्यावर अनेक निर्बंध आले होते, मला एकटे वाटू लागले होते, मला तिथे राहताना जगावेसे वाटत नव्हते, माझ्या मुलाचा रंग कसा असेल यामुळे राजघराणे चिंतीत होते, असे काय काय खुलासे मेगनने केलेत. मेगनच्या या धक्कादायक खुलाशांवर ब्रिटनच्या राजघराण्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवाल हिने मात्र एक ट्विट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मेगनच्या मुलाखतीची जितकी चर्चा होतेय, तितकीच यावरच्या सिमीच्या ट्विटचीही चर्चा सध्या होतेय. सिमीने मेगनला चक्क खोटारडी ठरवले आहे. ‘मला मेगन मार्कलच्या एकाही शब्दावर विश्वास नाही. अगदी एकाही शब्दावर नाही. ती (मेगन मार्कल) खोट बोलतेय आणि स्वत: पीडित दाखवण्याचा प्रयत्न करतेय. सहानुभूती मिळवण्यासाठी वर्णद्वेषाचे कार्ड खेळतेय. दृष्ट,’ असे ट्विट सिमीने केले.

या ट्विटनंतर काय झाले तर, सिमी स्वत:च सोशल मीडियावर ट्रोल झाली. या ट्रोलिंगनंतर सिमीने मेगनसाठी वापरलेला ‘दृष्ट’ हा शब्द मागे घेतला. ‘दृष्ट’ हा शब्द मी मागे घेते. याऐवजी  ‘कॅलक्युलेटिीव्ह’ (तोलून मापून बोलणारा) हा शब्द जास्त योग्य राहिल,’ असे ट्विट तिने केले.

2016मध्ये प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांची भेट झाली होती.  दोन वर्षांनंतर हॅरी आणि मेगन मर्कल यांचे लग्न झाले. या दांपत्याला आर्ची नावाचा मुलगा आहे. मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती.  प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे.   2011 मध्ये तिने अमेरिकन निमार्ता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.गेल्या वर्षी, हॅरी आणि मेगन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य या भूमिकेतून बाजूला होत असल्याचे जाहिर केले होते.

 मेगनचे खुलासे

मेननने यावेळी राजघराण्यात आपण होतो तेव्हा मनात आत्महत्येचे विचार येत होते. राजघराण्यात विवाह होऊन गेल्यानंतर माझे स्वातंत्र्य खूप कमी झाले होते. राजघराण्यामुळे खूप एकटेपणा आला होता. अनेक दिवस आपल्याला एकटेपणा जाणवत होता. याआधी इतका एकटेपणा आपल्याला कधीच जाणवला नव्हता. मित्र-मैत्रीणींसोबत बाहेर लंचसाठी जाण्याची मुभादेखील नव्हती. मी गरोदर असताना आमच्या बाळाला सुरक्षा मिळणार का यासंदर्भात निर्णय झाला. त्याला उपाधी मिळणार नाही हेही स्पष्ट करण्यात आले. मात्र त्यावेळी जी कुजबूज मी ऐकली त्याने मला धक्का बसला. बाळाचा रंग काळा असेल का यासंदर्भात लोक बोलत असत.  मी त्यांचे नाव सांगणार नाही.  हॅरीने मला ही गोष्ट सांगितली कारण लोक त्याच्याशी यासंदर्भात बोलत असत, असे धक्कादायक खुलासे मेगनने या मुलाखतीत केले आहेत.

टॅग्स :सिमी गरेवालमेगन मार्केल