Join us

सलमान खानचा 'सिकंदर' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार, पण कधी? जाणून घ्या तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:18 IST

'सिकंदर' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे.

सलमान खानचा बहुचर्चित अ‍ॅक्शन-ड्रामा सिनेमा 'सिकंदर' यंदा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० मार्च २०२५ रोजी थेट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाही.  आता या चित्रपटाची OTT  रिलिजची तयारी सुरु झाली आहे.

'गजनी' फेम ए.आर. मुरुगदॉस दिग्दर्शित' सिकंदरचं बजेट हे २०० कोटी रुपये होते. पण, सिनेमा थिएटर कलेक्शनमधून हा खर्च वसूल करू नाही.  OTT, सॅटेलाइट आणि म्युझिक राईट्सच्या माध्यमातून निर्मात्यांनी तोटा भरून काढला आहे.  OTT साठी 'सिकंदर' ने जवळपास ८५ कोटींचा करार केला असल्याची माहिती समोर आली होती. 

माहितीनुसार,  'सिकंदर' २५ मे २०२५ रोजी Netflix या प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या चित्रपटात सलमान आणि रश्मिकासोबत सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, जतिन सरना, संजय कपूर, नवाब शाह आणि अंजिनी धवन यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.  आता  'सिकंदर' Netflix वर काय धमाल उडवतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 'सिकंदर'नंतर सलमान पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. सलमान सत्य घटनेवरील गलवान व्हॅली संघर्षावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. सलमान लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या चित्रपटाचं टायटल अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानानेटफ्लिक्स