Join us  

'डोळ्यात पाणी आहे, पण...'; राखी सावंतने सांगितली सिद्धार्थच्या आईची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 10:15 AM

Sidharth shukla : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सिद्धार्थची प्राणज्योत मालवली. मात्र त्याची ही एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.

ठळक मुद्दे'तो गेला' हे एकच वाक्य त्या सतत बोलतायेत.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सिद्धार्थची प्राणज्योत मालवली असून त्याने घेतलेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या घटनेचा धक्का बसला आहे. त्यातच अभिनेत्री शहनाज गिल आणि सिद्धार्थचे कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरणं कठीण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच अभिनेत्री राखी सावंतने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सिद्धार्थच्या आईवर या सगळ्याचा कशाप्रकारे परिणाम झालाय हे सांगितलं आहे.

सिद्धार्थ शुक्लावर ३ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राखी सावंतसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले आले होते. विशेष म्हणजे यावेळी सिद्धार्थच्या आईची अवस्था पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी सिद्धार्थच्या आईची नेमकी परिस्थिती कशी होती हेच राखीने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

"आताच मी सिद्धार्थच्या घरी जाऊन त्याच्या आईची भेट घेतली. पण, त्या ठीक नाहीत. 'तो गेला 'हे एकच वाक्य त्या सतत बोलतायेत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, की सिद्धार्थ कुठेच गेला नाहीये. तो तुमच्याच जवळ आहे. तो फक्त देहरुपाने आपल्या जवळ नाही. पण त्याचं आत्मा तर आपल्या जवळच राहिली कायम", असं राखी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्याच्या घरची परिस्थितीदेखील फारशी ठीक नाही. घरातील प्रत्येकालाच जबरदस्त धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या आईच्या डोळ्यात पाणी आहे.पण त्या भानावर नाहीत. त्यांची प्रकृती फारच खराब झाली आहे." 

'दोन्ही टोकाच्या भूमिका, पण...'; राणादाने शेअर केला नव्या मालिकेचा अनुभव

दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या ४० व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केले. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्यानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.  

टॅग्स :राखी सावंतसिद्धार्थ शुक्लासेलिब्रिटीबॉलिवूड