Join us  

Sidharth kiara Sangeet: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाट बघाच, असा सजलाय सूर्यगढ पॅलेस, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 10:29 AM

Sidharth Malhotra And Kiara Advani Wedding : संगीत पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर..

Sidharth Malhotra And Kiara Advani Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा उद्या ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित होणार्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर राहणार आहेत. करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांसह अनेक कलाकार जैसरमेरला पोहोचले आहेत. या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आता कियारा- सिद्धार्थच्या संगीत सेरेमनीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. 

सूर्यगढ पॅलेस अगदी राजमहालासारखा सजवण्यात आला आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी लग्नस्थळी राजस्थानी खास लोककलावंतांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

आता संगीत सेरेमनी स्थळीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत संगीत सेरेमनीची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मोठमोठे झुंबर, पाहुण्यांची शाही बैठक व्यवस्था आणि मध्यभागी उभारण्यात आलेला स्टेज असा सगळा शाही माहौल व्हिडिओत पाहायला मिळतोय.  

लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.सूर्यगढ पॅलेसचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अख्खा महल सजवण्यात आला आहे. फुलांचे गालिचे अंथरले आहेत. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आलेले लोककलावंत नृत्य करताना दिसत आहेत.

अगदी जैसलमेर विमानतळावरही पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. राजस्थानी लोककलावंत पारंपरिक पद्धतीने नाचत गात पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. सिद्धार्थ व कियारा आज ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार, असं प्रारंभिक वृत्तात म्हटलं होतं. पण ताज्या अपडेटनुसार, उद्या ७ तारखेला विवाह सोहळा पार पडणार आहे. आज प्री वेडिंग फंक्शन्स होणार आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीबॉलिवूड