सिद्धार्थ-आलियाचा ‘ईश्क वाला लव्ह’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:35 IST
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपट ...
सिद्धार्थ-आलियाचा ‘ईश्क वाला लव्ह’!
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपट मिळत गेले. त्यांचे वैयक्तिक आयुष्यात अनेक बदल झाले. सिद्धार्थ आणि आलिया यांच्यात प्रेमाचे अंकूरही फुटले.ते सध्या यूएसला ‘ड्रीम टीम टूर’ या लाईव्ह सोहळ्यासाठी गेले आहेत. तिथे त्यांनी ‘ईश्क वाला लव्ह’ या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ अ मोमेंट आॅफ क्वाईट अमिडस्ट द नॉईज.’ परफॉर्मन्स करत असतांना ते एकमेकांमध्ये प्रचंड गुंतले होते. एकमेकांसोबत खुपच कम्फर्टेबल वाटत होते.