सिद्धार्थ मल्होत्राच्या आई-वडिलांना भेटली आलिया भट्ट; मग काय झाले ते वाचाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 10:12 IST
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडचे मोस्ट हॅपनिंग कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आलिया व सिद्धार्थने अद्याप ...
सिद्धार्थ मल्होत्राच्या आई-वडिलांना भेटली आलिया भट्ट; मग काय झाले ते वाचाच!
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडचे मोस्ट हॅपनिंग कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आलिया व सिद्धार्थने अद्याप आपले नाते कबुल केलेले नाही. आम्ही चांगले मित्र आहोत, एवढेच ते आत्तापर्यंत सांगत आले आहेत. पण कदाचित दोघांनीही हे नाते एका सुंदर मुक्कामापर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे. होय, अलिकडे आलिया सिद्धार्थच्या आई-वडिलांना भेटली. आलियाची सिद्धार्थच्या आई-वडिलांशी भेट घालून देण्यात कुण्या व्यक्तिचा मोठा रोल होता माहितीयं? करण जोहर. करणने नुकतीच आपल्या घरी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत सिद्धार्थच्या आई-वडिलांनाही अगत्याचे निमंत्रण होते. मग काय, या पार्टीच्या निमित्ताने आलिया सिद्धार्थच्या आई-वडिलांना भेटली. यानंतर काय झाले, हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असाल. तर ते तूर्तास गुलदस्त्यात आहे. कारण आलिया व सिद्धार्थ चुप्पी तोडतील, असे वाटत नाही. आलिया सिद्धार्थच्या आई-वडिलांना भेटली, याची फार चर्चा होऊ नये, म्हणून तिने लगेच पार्टीतून काढता पाय घेतला. पण शेवटी या नियोजित भेटीचे गुपित बाहेर आलेच. आलिया व सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे ही आनंदाची बातमी आहे.सिद्धार्थ व आलिया भलेही अधिकृतपणे आपले रिलेशन मान्य करायला तयार नसतील. पण दोघेही एकमेकांवर किती प्रेम करतात, याची हिंट न चुकता देतात. दोघेही अनेकदा एकत्र इव्हेंटला जातात. कधी पार्टी तर कधी डिनर डेट एन्जॉय करतात. या लव्हबर्ड्सच्या नात्याला कुणाचीही दृष्ट लागू नये, इतक्याच शुभेच्छा आपण देऊ यात. आलिया व सिद्धार्थची जोडी लवकरच ‘आशिकी3’मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.