Join us

​सिद्धार्थ मल्होत्राच्या केसांनी केली ‘रिलोडेड’च्या मेकर्सची गोची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 10:10 IST

‘रिलोडेड’ या चित्रपटातील एका धम्माल गाण्याचे शूटींग सध्या रखडले आहे. पण हे शूटींग रखडण्यामागचे कारण ऐकाल तर तुम्हीही चाट ...

‘रिलोडेड’ या चित्रपटातील एका धम्माल गाण्याचे शूटींग सध्या रखडले आहे. पण हे शूटींग रखडण्यामागचे कारण ऐकाल तर तुम्हीही चाट पडाल. होय,‘रिलोडेड’चे शूटींग रखडले ते यातील लीड अ‍ॅक्टरच्या केसांमुळे. म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रांच्या केसांमुळे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा लीड रोलमध्ये आहे. त्याच्या केसांमुळे चित्रपटाचे एक गाणे शूट होता होता राहिले. खरे तर जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांनी गतवर्षीच या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले. यानंतर सिद्धार्थ व जॅक दोघेही आपआपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. जॅकलिनने सुशांतसिंह राजपूतसोबतच्या एका चित्रपटाची तयारी सुुरू केली तर सिद्धार्थ सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या ‘इत्तेफाक’ या सिनेमाच्या रिमेकमध्ये  व्यस्त झाला. मग काय? ‘इत्तेफाक’साठी सिद्धार्थने आपले केस कापले आणि इथेच ‘रिलोडेड’च्या मेकर्सची गोची झाली. कारण ‘रिलोडेड’साठी एक प्रमोशनल साँग शूट करण्याचा मेकर्सचा इरादा होता आणि यासाठी सिद्धार्थचा ‘रिलोडेड’ लूक त्यांना हवा होता. पण सिद्धार्थच्या केसांनी यात अडचण निर्माण केली. त्यामुळे किमान जूनपर्यंत तरी म्हणजेच केस वाढेपर्यंत  सिद्धार्थ या गाण्याचे शूट करू शकणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर तोडगा म्हणून मेकर्सनी ‘रिलोडेड’च्या रिलीजच्या तोंडावर हे गाणे शूट करण्याचा निर्णय घेतला आहे.ALSO READ : सिद्धार्थची सेटवर स्टंटबाजी!प्रांरभी ‘रिलोडेड’मध्ये बादशाहचे ‘बंदूक’हे गाण नवा तडका देऊन या चित्रपटात सामील केले जाणार होते. पण आता याऐवजी बादशाहसोबत एक नवे फन नंबर शूट करण्याचा निर्णय मेकर्सने घेतला आहे. पण या गाण्याच्या शूटसाठी सिद्धार्थला त्याचे केस पुन्हा वाढवावे लागणार आहे. म्हणजेच सिद्धार्थला पुन्हा ‘रिलोडेड’ लूकमध्ये परतावे लागणार आहे. आता तो ‘रिलोडेड’लूकमध्ये कधी परततो आणि या गाण्याचे शूट कधी होते, हे बघूच.