Join us  

श्वेता तिवारीच्या मुलीचे वाढले भाव; सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाचे आॅडिशन नाकारले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 10:51 AM

काही दिवसांपूर्वीच अशी बातमी समोर आली की, बॉलिवूड अभिनेता सनी देओल याच्या मुलाच्या डेब्यू चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध संपला आहे. ...

काही दिवसांपूर्वीच अशी बातमी समोर आली की, बॉलिवूड अभिनेता सनी देओल याच्या मुलाच्या डेब्यू चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध संपला आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सनी पाजीच्या मुलाची हिरोईन होणार आहे. मात्र आता आलेल्या माहितीनुसार श्वेता तिवारीच्या मुलीचे म्हणजेच पलक तिवारीचे भाव वाढले असून, तिने सनीपाजीच्या मुलाच्या चित्रपटाचे आॅडिशन देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. आता तिने यास का नकार दिला? याबाबतचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नसले तरी, पलकचे अ‍ॅटिट्यूड मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच सनीपाजीचा मुलगा करण देओल याच्या आगामी ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात पलक तिवारी मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. पलकची निवड खुद्द सनीपाजीनेच केली होती. मात्र यावर आणखी चर्चा रंगणार तोच पलकने त्यास पूर्णविराम दिला आहे. तिने स्पष्ट शब्दात आॅडिशन देण्यास नकार दिला आहे. सनी देओल त्याच्या मुलाच्या या चित्रपटामुळे प्रचंड उत्साहित आहे. आपल्या मुलासाठी अभिनेत्री शोधण्यासाठी त्याने तब्बल २०० मुलींचे आॅडिशनही घेतले आहेत. परंतु त्यातील एकही मुलगी सनीला करणची हिरोईन म्हणून पसंत आली नव्हती. अखेर सनीपाजीची नजर पलकच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर गेली. पलकचे फोटो पाहताच सनी तिचा चाहता झाला. अधिक वेळ न दवडता त्याने लगेचच पलकला आॅडिशनसाठी येण्याचे निमंत्रणही दिले. मात्र अशातही पलक आॅडिशनसाठी पोहोचली नाही. पलकने ही आॅफर का नाकारली हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र असे म्हटले जात आहे की, पलक आमिर खान याच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातून स्टार बनलेल्या दर्शिल सफारी याच्यासोबत आपल्या चित्रपट करिअरला सुरुवात करणार आहे. पलक दर्शिलबरोबर ‘क्वीकी’ या चित्रपटात बघावयास मिळू शकते. पलक तिवारीविषयी सांगायचे झाल्यास, ती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे नेहमीच फोटो बघावयास मिळतात. पलकचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी एकप्रकारची पर्वणीच असते. गेल्यावेळेस पलकने तिच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी एक सुंदर फोटोशूट केले होते. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळाली होती.