Join us  

रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात 'सेक्रेड गेम्स'मधील ही अभिनेत्री साकारणार शूर्पणखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:26 AM

रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा आगामी चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie) सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान आता शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची देखील माहिती समोर आली आहे.

रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा आगामी चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie) सध्या खूप चर्चेत आहे. यात एकापेक्षा एक दमदार कलाकार झळकणार आहेत. आतापर्यंत KGF आणि KGF 2 फेम यश, सनी देओल, बॉबी देओल, लारा दत्ता आणि साई पल्लवी यांची नावे या प्रोजेक्टमध्ये जोडली जात होती, त्यापैकी बॉबीने या अफवांचे खंडन केले आहे. दरम्यान आता या चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दलही माहिती समोर आली आहे. तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकीची हिट वेब सिरीज 'सेक्रेड गेम्स' आठवत असेल आणि त्यातील कुक्कू म्हणजेच अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) आठवत असेल. आता असे बोलले जात आहे की नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये कुब्राचीही एन्ट्री होऊ शकते!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कुब्रा सैतने रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाची भूमिका साकारण्यासाठी ऑडिशन दिले आहे. तिला पूर्ण आशा आहे की ती या फ्रँचायझीचा एक भाग असेल. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

कुब्रा सैत ही टीव्ही होस्ट आणि मॉडेल आहे. तिने 'सुलतान', 'रेडी' आणि 'सिटी ऑफ लाईफ' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तथापि, ती नेटफ्लिक्स मालिका सेक्रेड गेम्ससाठी प्रसिद्ध आहे. तिने या शोमध्ये कुक्कुची भूमिका साकारली होती. ती २०२४ मध्ये देवा या चित्रपटात दिसणार आहे.

बॉबी देओलनं केलं वृत्ताचं खंडनया चित्रपटात बॉबी देओलला कुंभ करणाची भूमिका ऑफर करण्यात आल्याची बातमी होती. मात्र, त्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. ती दक्षिणेतील 'कुंगवा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यात सुरियाचीही भूमिका आहे. यासोबतच त्याच्याकडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची 'स्टारडम' ही वेबसिरीज आहे.

कोणाला काय भूमिका मिळाली?रामायण या चित्रपटात रणबीर कपूर रामची भूमिका साकारणार आहे. साई पल्लवीला सीता मातेची भूमिका मिळाली आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत तर लारा दत्ता राजा दशरथची तिसरी पत्नी कैकेयीची भूमिका साकारणार आहे. साऊथचा सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यासाठी आपल्याला निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :रामायणरणबीर कपूरयशबॉबी देओल