Join us  

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकली श्रुती हासन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:50 PM

बॉलिवूडचे अनेक स्टार्स सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि या व्हॅकेशनचे फोटो शेअर करत आहेत. अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Hassan ) हिने अशा स्टार्सला चांगलेच सुनावले आहे.

ठळक मुद्देश्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘सलार’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाला केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नीलने दिग्दर्शित केले आहे.

कोरोना महामारीने भीषण रूप धारण केले आहे. स्थिती बिकट आहेत. रोज शेकडो जीव जात आहेत. हजारो लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. स्थिती इतकी गंभीर की, ऑक्सिजनसाठी, औषधांसाठी लोक सैरभैर होऊन फिरत आहेत. अशात काही लोक मालदीवमधील व्हॅकेशनचे फोटो शेअर करण्यात मस्त आहेत. बॉलिवूडचे अनेक स्टार्स सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि या व्हॅकेशनचे फोटो शेअर करत आहेत. अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Hassan ) हिने अशा स्टार्सला चांगलेच सुनावले आहे. (Shruti Hassan slams celebrities enjoying vacation in maldives amid corona pandameic)

सध्या बॉलिवूडचे अनेक स्टार्स मालदीवमध्ये आहेत. रणबीर कपूर, आलिया भट, दिशा पाटनी, टायगर श्रॉफ, सारा अली खान हे सगळे सुट्टी एन्जॉय करत आहेत.‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत श्रुती हासनने फिल्मी स्टार्सच्या या वागण्याची निंदा केली. त्यांची सुट्टी शानदार होती, हे ऐकून आनंद वाटतो. सुट्टी एन्जॉय करणे हा त्यांचा हक्क आहे. पण व्यक्तिश: माझे मत विचाराल तर मास्क काढून पूलमध्ये उतरण्याची ही वेळ नाही. हा कठीण काळ आहे. काही लोकांसाठी तर खूपच कठीण. सगळं काही सहज मिळतंय, या प्रीव्हिलेजसाठी आभार व्यक्त करणे गरजेचे आहे. पण हे प्रीव्हिलेज अशाप्रकारे लोकांच्या तोंडावर मारणे योग्य नाही. दिखावा करण्याची गरज नाही, असे श्रुती या मुलाखतीत म्हणाली.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर माझे काही मित्र सुट्टीचे प्लानिंग करत होते. मात्र मी त्यांना नकार दिला. इतकेच नाही तर त्यांनाही सुट्टीवर जाण्यास मनाई केली. त्यांनी मला वेड्यात काढले, असेही तिने सांगितले.श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘सलार’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाला केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नीलने दिग्दर्शित केले आहे. या अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमात श्रुती सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :श्रुती हसन