Join us  

'मी पृथ्वी कन्या' म्हणत, श्रिया पिळगावकरने शेअर केले फोटो, हटके फोटोशूटची सोशल मीडियावर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 5:05 PM

मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. श्रिया पिळगावकर लवकरच हाथी मेरे साथी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राणा दुग्गाबती, पुलकित सम्राट आणि झोया हुसेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रिया सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरची लेक आहे.

श्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. श्रियाने तिचे लेटेस्ट फोटोशूटची  इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोंमध्ये ट्रेडिशनल लूकमध्ये नाकात नथ घालून श्रेया नदीच्या किनारी बसलेली दिसतेय. पृथ्वी कन्या असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. सध्या सोशल मिडियावर श्रेयाच्या या लुकची बरीच चर्चा देखील रंगली आहे. काही वेळातच तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.  चाहत्यांनी  ​तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

‘हाथी मेरे साथी’मध्ये श्रिया अरुंधती हे एक तरुण पत्रकाराचे पात्र साकारत असून ती हत्ती व त्यांचा अधिवास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे तर राणा बंडदेवची भूमिका साकारत आहे. ही एक कथा आहे जी अनेक घटनांनी प्रेरित आहे ज्याने आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग जंगलामध्ये घालविला आहे, अशा व्यक्तीची (राणा डग्गुबाती) ही कथा आहे, जी पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित आहे. हा २०२१ चा पहिला त्रीभाषी चित्रपट असून तेलगूमध्ये ‘अरण्य’ आणि तामिळमध्ये ‘कदान’ या नावाने प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :श्रिया पिळगावकर