Join us  

राणा दग्गुबतीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतेय श्रिया पिळगावकर, अभिनेत्रीने शेअर केला हाथी मेरे साथीचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 4:42 PM

अभिनेत्री श्रिया पिळगावकर सांगतेय ‘हाथी मेरे साथी’मधील राणा दग्गुबती यांच्यासोबत काम करण्याच्या आपल्या अनुभावांविषयी

राणा डग्गुबती, पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन यांच्यासाठी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाचे चित्रीकरण हा एक अनोखा अनुभव होता कारण त्यांनी चित्रिकरणासाठी काही महिने केरळच्या जंगलात एकत्र घालवले. यात त्यांना एकमेकांसोबत एकत्र भरपूर वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्यांचे बाँडिंग आणि एकमेकांच्या कलेचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली.

आपला सहकलाकार, पॅन-इंडिया स्टार, राणा डग्गुबती याच्यासोबत काम करण्याच्या आपल्या अनुभवांविषयी श्रिया सांगते, "राणा ज्या प्रकारे समरसून पात्र साकारतो, हे पाहण्यासारखे तर आहेच पण कलाकार म्हणूनही त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्याच्याबरोबर काम करण्यास खूप मजा आली. तो अष्टपैलू अभिनेता आहे आणि चित्रपटाबद्दलचे त्याचे समर्पण आणि वचनबद्धता प्रेरणादायक आहे. ‘हाथी मेरे साथी’च्या सेटवर एकत्र काम करताना राणातील एक महान कलाकार आणि त्यासोबतच त्यातील एक सामान्य माणूस समजून घ्यायला खूप चांगला वेळ मिळाला."

‘हाथी मेरे साथी’मध्ये श्रिया अरुंधती हे एक तरुण पत्रकाराचे पात्र साकारत असून ती हत्ती व त्यांचा अधिवास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे तर राणा बंडदेवची भूमिका साकारत आहे. ही एक कथा आहे जी अनेक घटनांनी प्रेरित आहे ज्याने आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग जंगलामध्ये घालविला आहे, अशा व्यक्तीची (राणा डग्गुबाती) ही कथा आहे, जी पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित आहे. हा २०२१ चा पहिला त्रीभाषी चित्रपट असून तेलगूमध्ये ‘अरण्य’ आणि तामिळमध्ये ‘कदान’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू सोलोमन यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती इरोज मोशन पिक्चर्स, इरोज एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशनच्या विभागाने केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही एक प्रस्थापित कंपनी आहे, ज्यांचा या क्षेत्रातील अनुभव ४० हुन अधिक वर्षांचा आहे. २६ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

टॅग्स :श्रिया पिळगावकरराणा दग्गुबती