Join us  

श्रेयस तळपदे पहिल्यांदाच साकारली नकारात्मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 8:00 PM

‘सेटर्स’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात श्रेयस तळपदेने नेगेटिव्ह भूमिका साकारली आहे. आता पर्यंतच्या करिअरमध्ये श्रेयसने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे

ठळक मुद्दे'इकबाल' या चित्रपटामधून श्रेयसने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते

‘सेटर्स’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात श्रेयस तळपदेने नेगेटिव्ह भूमिका साकारली आहे. आता पर्यंतच्या करिअरमध्ये श्रेयसने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे. नागेश कुकुनूरच्या २००५ मधील इकबाल या चित्रपटामधून श्रेयसने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. श्रेयस तळपदे सर्टस मध्ये अपूर्व या खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी त्यांने बरीच मेहनत घेतली असून शिक्षणाच्या क्षेत्रातील माफियाच्या भूमिकेत तो दिसला. वाराणसी, जयपूर, मुंबई, नवी दिल्ली या राज्यातील माफियाचे जाळे आणि होत असलेल्या वेगवेगळया घडामोडी, डमी उमेदवार, पेपर फिक्सिंग असे गैरप्रकार यांच्याबद्दल हा चित्रपट आधारित आहे.

 लव्हली फिल्म्स प्रोडक्शन आणि एनएच स्टुडिओज निर्मित ‘सेटर्स’ चित्रपटात श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, सोनाली सेहगल, इशिता दत्ता, पवन मल्होत्रा, विजय राज, जमील खान, मनू रिशी, पंकज झा, नीरज सूद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

श्रेयसबाबत बोलायचे झाले तर मराठी चित्रपटसृष्टीद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली असली तरी त्याने आज हिंदीत देखील त्याची चांगली ओळख निर्माण केली आहे. ‘गोलमाल’सीरिज, ‘इकबाल’, ‘डोर’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात आणि ‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये श्रेयसने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहे. कॉमेडी, गंभीर अशा सगळ्याच भूमिका तो चांगल्याप्रकारे साकारू शकतो हे त्याने त्याच्या अभिनयातून सिद्ध केले आहे. 

टॅग्स :श्रेयस तळपदे