Join us

श्रद्धा कपूर चिंतीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 10:36 IST

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ साठी शूटिंग करत आहेत. ‘आशिकी २’ ...

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ साठी शूटिंग करत आहेत. ‘आशिकी २’ सारखी केमिस्ट्री पुन्हा आॅनस्क्रीन करायची म्हटल्यानंतर श्रद्धा कपूरला थोडंसं टेन्शन आल्याचे कळते आहे. तिला वाटते आहे की, हा चित्रपट म्हणजे अत्यंत रोमँटिक प्रकारचा असून असा चित्रपट आम्ही एकदाही केला नाही.हा अगदीच वेगळा चित्रपट असून तमीळ चित्रपट ‘ओके कन्मनी’ वर आधारित आहे. प्रेक्षकांना चित्रपट आवडेल अशी अपेक्षा आहे. श्रद्धा म्हणते,‘ प्रत्येक चित्रपट रिलीज होण्याअगोदर मी खुप नर्व्हस होत असते.  प्रत्येक चित्रपटावेळी मी डेब्यू करत असल्यासारखे वाटते.’ ती सध्या ‘मसाबा’ च्या ‘लॅक्मे फॅशन वीक समर २०१६’ रॅम्पसाठी खुप जास्त उत्सुक आहे.ती म्हणते,‘मी खुप दिवसांपासून ‘मसाबा’साठी रॅम्प वॉक करायचा म्हणून वाट पाहते आहे. अखेर, ते घडतेय आता. डिझायनरने माझ्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे ड्रेस निवडून काढले आहेत ते जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.