श्रद्धा कपूरने करिअरसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 15:27 IST
श्रद्धा कपूरच्या करिअरला सध्या ओहोटी लागलीय. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटानंतर श्रद्धा काहीसी चिंतीत आहे. सोबतच वेळीच सावरले नाही ...
श्रद्धा कपूरने करिअरसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
श्रद्धा कपूरच्या करिअरला सध्या ओहोटी लागलीय. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटानंतर श्रद्धा काहीसी चिंतीत आहे. सोबतच वेळीच सावरले नाही तर अख्खे करिअर संपेल, हेही श्रद्धाला कळून चुकले आहे. आपले करिअर रूळांवर आणण्यासाठी श्रद्धाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कुठला? तर तिच्या मॅनेजर्सची टीम बदलण्याचा. शिवाय एक नवी पीआर एजन्सी हायर करण्याचा. भविष्यात श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे तिचे प्रोफेशनल करिअर हँडल करणार असेही ऐकायला मिळतेय.सन २०१० मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून श्रद्धाने बॉलिवूड डेब्यू केला होता. मात्र हा चित्रपट श्रद्धाला फार ओळख देऊ शकला नाही. यानंतर २०१३ मध्ये ‘आशिकी2’ आला आणि श्रद्धा रातोरात स्टार झाली. या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. यात ती आदित्य राय कपूरसोबत दिसली होती. तिची व आदित्यची जोडी सुपरहिट ठरली होती. यानंतर पुढच्याच वर्षी श्रद्धाचे ‘एक विलेन’ आणि ‘हैदर’ हे दोन सिनेमे आले. या चित्रपटानेही श्रद्धाच्या करिअरला गती दिली. २०१५ मध्ये आलेला ‘एबीसीडी2’आणि ‘बागी2’ हे तिचे सिनेमेही यशस्वी ठरले. हा काळ श्रद्धाच्या करिअरमधील सगळ्यात चांगला काळ होता. मात्र यानंतर तिच्या करिअरला जणू ब्रेक लागला. ‘रॉक आॅन2’आपटला. पाठोपाठ आलेल्या ‘ओके जानू’ या सिनेमानेही श्रद्धाची निराशा केली. ‘ओके जानू’कडून तिला मोठी अपेक्षा होती. कारण यात ती पुन्हा एकदा आदित्य राय कपूरसोबत परतली होती. पण एकापाठोपाठ एक असे हे दोन्ही सिनेमे बॉक्सआॅफिसवर आपटले आणि श्रद्धा खळबळून जागी झाली. आता गंभीरपणे घ्यायला हवे, असे कदाचित तिला वाटले असावे. त्यामुळेच मॅनेजरची टीम बदलण्याचा आणि नवी पीआर एजन्सी हायर करण्याचा निर्णय तिने घेतल्याचे कळते.ALSO READ :श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या नात्याला हनी इराणीचा विरोधश्रद्धा म्हणाली, होय, मी ‘लिव्ह इन’मध्ये आहे. पण...!!श्रद्धाचा आता ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटात दिसणार आहे. यात ती अर्जुन कपूरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय ‘हसीना’ या चित्रपटात ती लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित आहे.