श्रद्धा कपूरला म्हणते, स्क्रिप्टमध्ये बदल केला तरच सिद्धार्थसोबत काम करेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 12:54 IST
बी-टाऊनमधील डॅशिंग सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. चार वर्षांपूर्वी 'एक व्हिलन' या चित्रपटात एकत्र ...
श्रद्धा कपूरला म्हणते, स्क्रिप्टमध्ये बदल केला तरच सिद्धार्थसोबत काम करेन
बी-टाऊनमधील डॅशिंग सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. चार वर्षांपूर्वी 'एक व्हिलन' या चित्रपटात एकत्र दिसलेली ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. एकता कपूर निर्मित या चित्रपटात ते एकत्र दिसणार आहेत. 'शॉटगन शादी' असे या चित्रपटाचे नाव आहे. सिद्धार्थ ह्या चित्रपटात एक बिहारी गुंडांची भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ अशी भूमिका पहिल्यांदाच करतो आहे.मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा कपूरने या चित्रपटाच्या मेकर्सना पटकथेत बदल करण्याची विनंती केली आहे. असे म्हणणे आहे की, श्रद्धाला ह्या चित्रपटातील तिची भूमिका सिद्धार्थच्या भूमिकेपेक्षा कमी वजनाची वाटते आणि तिच्या भूमिकेला सिद्धार्थपेक्षा जास्त वजन हवे आहे. सूत्रानुसार असे ही कळले आहे की, जर तिच्या म्हणण्यानुसार चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल झाला नाही तर हा चित्रपट करण्यास ती नकार देऊ शकते.ALSO READ : OMG : फरहान अख्तरने सोडला श्रद्धा कपूरमुळे चित्रपट !'शॉटगन शादी' हा चित्रपट बिहारमध्ये सध्या चालत असलेल्या बळजबरी विवाह करून देण्याच्या म्हणजेच 'पकडूआ शादी' ह्या प्रथेवर आधारित आहे. ह्या चित्रपटासाठी एकताने सिद्धार्थला बॉडी बनवण्याचा सल्ला दिला आहे. सिद्धार्थकडे 'शॉटगन शादी' ह्या चित्रपटाव्यतिरिक्त कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन 'विक्रम बात्रा' बायोपिकयमध्ये सुद्धा दिसणार आहे. श्रद्धा कपूर सध्या 'बत्ती गुल मिटर चालू' ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. श्रद्धा कपूर प्रभासच्या 'साहो'मध्ये सुद्धा दिसणार आहे.यात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि यामी गौतमसुद्धा दिसणार आहेत.‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. श्रीनारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट यावर्षी ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.