Join us

प्रभासवर नाही तर 'या' अभिनेत्यावर फिदा झाली श्रद्धा कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:01 IST

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीचा साहो चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यात नील नितिन मुकेशसुद्धा या चित्रपटात दिसणार आहे, ...

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीचा साहो चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यात नील नितिन मुकेशसुद्धा या चित्रपटात दिसणार आहे, हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आपल्या सहकलाकार नीलच्या अभिनयाने श्रद्धा खूपच प्रभावित झाली आहे. याआधी नीलने श्रद्धा आणि प्रभासच्या अभिनयाचे कौतुक केले होते. नीलने ट्वीटरवर लिहिले होते, प्रभास खूपच प्रेमळ व्यक्ती आहे तर श्रद्धा ही खूप चांगली आहे. लवकरच तुम्हाला परत भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. देवाची कृपा तुमच्यावर नेहमीच राहु देत.''     श्रद्धाने या ट्विला उत्तर देताना लिहिले आहे, बघा कोण काय बोलते आहे ते. सेटवर सगळेजण तुझा अभिनय बघून प्रभावित झाले आहेत. लंडनमध्ये तुझावेळ खूप चांगला जावा.'' नील नितिन मुकेश  ‘फिरकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनमध्ये गेला आहे. साहोचे शूटिंग सुरु करण्याआधी सुद्धा नील लंडनमध्ये फिरकीच्या शूटिंगसाठी गेला होता. यावेळी त्याच्या पत्नी ही त्याच्यासोबत गेली होती. फिरकी हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात नीलसह जॅकी श्रॉफी, के.के मेनन आणि करण सिंग ग्रोवरसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश भट्ट आणि शिबानी दांडेकर करणार आहे.  ALSO RAED :  ‘साहो’मध्ये खलनायक साकारणाऱ्या नील नितीन मुकेशने ‘बाहुबली’ प्रभासविषयी केले ‘हे’ वक्तव्य!नील लंडन गेला असला तरी श्रद्धा आणि प्रभास हैदराबादमध्ये साहोचे शूटिंग करण्यात अजून व्यस्त आहे. यात श्रद्धाचा डबल रोल असणार आहे.  साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट 150 कोटी रुपये इतके आहे. श्रद्धाने यात काम करण्यासाठी  12 कोटींचे मानधन मागितले होते मात्र मेकर्सने तिला  9 कोटी रुपयांवर तडजोड करायला लावली. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा एक अॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. साहोमध्ये जॅकी श्रॉफ आणि मंदिरा बेदी यांच्या ही भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाच श्रद्धा कपूर प्रभाससोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.