अमिताभ-आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये श्रद्धा कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 21:08 IST
निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये आमिर खान व अमिताभ बच्चन यांची जोडी दिसणार आहे. या चित्रपटाची नायिका ...
अमिताभ-आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये श्रद्धा कपूर
निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये आमिर खान व अमिताभ बच्चन यांची जोडी दिसणार आहे. या चित्रपटाची नायिका कोण असेल असा प्रश्न मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. यासाठी अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत आहे. आता अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने ठग्स आॅफ हिंदोस्ता साठी स्क्रिन टेस्ट दिल्याची माहिती समोर आली असून ती या चित्रपटाची नायिकाा असू शकते असे सांगण्यात येत आहे. यशराज फिल्मस्च्या वतीने आदित्य चोपडा यांनी ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’ या चित्रपटाची घोषणा करताना यात बॉलिवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खान यांच्या प्रमुख भूमिका असेल असे सांगितले होते. मात्र यात अभिनेत्री कोण असणार याचा खुलासा करण्यात आला नव्हता. दोन मोठ्या नायकांसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्री उत्सुक होत्या. यात सर्वांत आघाडीवर आलिया भट्ट व वाणी कपूर याच्या नावाची चर्चा होती, दरम्यान यात मोनाली ठाकूरची वर्णी लागली असल्याचेही सांगण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या नायिकेच्या भूमिके साठी अभिनेत्रींमध्ये रस्सीखेच चालू असल्याचे दिसते. एका संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’ या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचे स्क्रिन टेस्ट घेण्यात आले. यात आलिया व वाणीचा देखील समावेश होता. आमिरला या चित्रपटात आलिया भट्ट तर आदित्यला वाणी कपूर यांनी लीड फिमेलचा रोल करावा असे वाटत होते. मात्र त्यांच्या जागी मोनाली ठाकूर हिला घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रींची नव्याने निवड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे श्रद्धाने स्क्रिन टेस्ट दिला असून तिची निवड निश्चित मानली जात आहे. अमिताभ बच्चन व आमिर खान ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येत आहेत. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत रिलीज केला जाणार आहे.