Join us  

हृदयभंग प्रचंड वेदनादायी असतो! अखेर श्रद्धा कपूरने दिली कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 7:20 PM

श्रद्धाची हळवी जखम जगापुढे आली होती. तिचा इशारा फरहानकडेच होता, हे सांगणे नकोच.

को-स्टारशी नाव जुळणे, हे बॉलिवूडमध्ये नवे नाही. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा यातून गेली आहे. ‘आशिकी2’ रिलीज झाला अन् श्रद्धाचे नाव यातील तिचा को-स्टार आदित्य रॉय कपूरसोबत जोडले गेले. त्याकाळात श्रद्धा व आदित्यच्या रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली. पण हे रिलेशनशिप संपले, तशी श्रद्धा व आदित्यची पडद्यावरची हॉट केमिस्ट्रीमधील जादूही ओसरली. होय, कारण ‘आशिकी2’नंतरचा या दोघांचा ‘ओके जानू’ दणकून आपटला. आदित्यनंतर श्रद्धाचे नाव फरहान अख्तरसोबत जोडले गेले. या दोघांच्या प्रेमाची चर्चाही प्रचंड रंगली. डॅड शक्ती कपूर यांना न जुमानता श्रद्धा फरहानसोबत लिव्ह इनमध्ये राहणार, अशा काय काय बातम्या आल्यात. कालांतराने हे रिलेशनशिपही संपले. पण कदाचित हे रिलेशनशिप श्रद्धाला बरीच खोल जखम देऊन गेले. होय, कारण असे नसते तर काल ‘स्त्री’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटवेळी श्रद्धा जे काही बोलली ते बोलली नसती. ‘स्त्री’साठी सर्वाधिक वेदनादायी गोष्ट कुठली? असा प्रश्न या ट्रेलर लॉन्चवेळी श्रद्धाला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘हृदयभंग सर्वाधिक वेदना देऊन जातो,’ असे श्रद्धा बोलून गेली. मनातले ते ओठांवर येतं म्हणतात, तसेच काही तिच्याबद्दल झाले. अर्थात काहीच क्षणात आपण काहीतरी वेगळं बोलून गेलोय, हे तिच्या लक्षात आले आणि तिने आपले वाक्य फिरवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता. श्रद्धाची हळवी जखम जगापुढे आली होती. तिचा इशारा फरहानकडेच होता, हे सांगणे नकोच.

 फरहान आणि श्रद्धाने पहिल्यांदा ‘रॉक आॅन-२’ मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांमधील अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही समोर आले होते. मात्र श्रद्धाचे वडील शक्ती कपूर या नात्याच्या प्रचंड विरोधात होते. त्यांनी श्रद्धाला फरहानपासून दूर राहण्याची स्पष्ट शब्दात ताकीद दिली होती. तर श्रद्धामुळे  फरहानची पहिली पत्नी अधुनाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असे ही म्हणतात.  फरहान आणि अधुनाच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर जबाबदार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.  फरहान आणि श्रद्धाची वाढती मैत्री अधुनाला अजिबात पसंत नव्हती. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.   

टॅग्स :फरहान अख्तरश्रद्धा कपूर