Join us

'या' तारखेला राजकुमार राव आणि कंगना सुरु करणार 'मेंटल है क्या'चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 15:15 IST

राजकुमार राव आणि कंगना राणौत यांचा नवा चित्रपट 'मेंटल है क्या' गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही ...

राजकुमार राव आणि कंगना राणौत यांचा नवा चित्रपट 'मेंटल है क्या' गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून एकामागोमाग एक चित्रपटाचे पोस्टर आऊट होतायेत. 'क्वीन'नंतर पुन्हा एकदा राजकुमार राव आणि कंगना राणौत स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. या चित्रपटा संदर्भात आता एक माहितीसमोर आली आहे. या चित्रपटाची शूटिंग 13 मे पासून होणार आहे. चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने ही माहिती दिली आहे. एकताने आयएएनएस दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले, 13 मे पासून आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत. याला घेऊन आम्ही उत्साहित आहोत. आम्ही या चित्रपटाच्या पोस्टरसुद्धा आऊट केला आहे. हा एक थ्रीलर कॉमेडी चित्रपट आहे. ALSO READ :  ​सोशल मीडियापासून का दूर पळते कंगना राणौत?तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’ या चित्रपटात बिझी आहे.  मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे.  काही दिवसांपूर्वी कंगनाचे सेटवरचे फोटो लीक झाले होते. ‘बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.  अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत.