Join us

आबुधाबीमध्ये 65 दिवस चालणार 'टायगर जिंदा है' चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 12:35 IST

सलमान आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'टायगर जिंदा है' चे शूटिंग सध्या सुरु आहे. अबुधाबीमध्ये हे शूटिंग ...

सलमान आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'टायगर जिंदा है' चे शूटिंग सध्या सुरु आहे. अबुधाबीमध्ये हे शूटिंग 65 दिवस चालणार आहे. याआधी या चित्रपटाचे शूटिंग मोरोक्को आणि वियनामध्ये करण्यात आले आहे. अबुधाबीमध्ये 4 मे पासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान आणि कॅटरिना यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहे.'स्टार वार्स' चित्रपटाचा सेट तयार केलेले आर्टिस्ट 'टायगर जिंदा है' चा सेट तयार करणार आहेत. यशराज प्रॉडक्शनचा हा चित्रपट 'एक था टायगर' चा सीक्वल असणार आहे. 'टायगर जिंदा है' चे दिग्दर्शक अब्बास जफर आहेत. वेगवेगळ्या देशात केलेल्या शूटिंगरबरोबरच आबुधाबी हे टायगर जिंदा है च्या चित्रिकरणासाठी सगळ्यात अचूक ठिकाण आहे. आशा आहे की चित्रपटाची संपूर्ण टीम याचा आनंद घेईल असे सलमान खानने एका मुलाखती दरम्यान म्हटले होते.  तर कॅटरिनाचा म्हणणे आहे आबूधाबीमध्ये मी शूटिंग करण्यासाठी उत्सुक आहे.  आबुधाबीमध्ये 'टायगर जिंदा है' चा सेट जळपास 150 कर्मचारी मिळून तयार करणार आहेत. हा सेट तयार करताना आम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत. तसेच सेट तयार करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य मिळते आहे ते उल्लेखनीय आहे असे दिग्दर्शक जाफरने म्हणणे आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या भागाचे शूटिंग ऑस्ट्रिया येथे  पूर्ण करण्यात आले आहे. ऑस्ट्रियात काही अ‍ॅक्शन सीन्सबरोबरच ‘दिल दिया’ या रोमॅण्टिक गाण्याचे शूटिंग करण्यात आले. सलमान- कॅटरिनाच्या केमिस्ट्री बघण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.