Join us  

शेतकरी आंदोलनमुळे शाहिद कपूरच्या 'जर्सी'चे शूटिंग थांबवले, आता देहरादूनमध्ये होणार सिनेमाचे शूटिंग

By गीतांजली | Published: December 08, 2020 3:22 PM

दिग्दर्शक गौमत टिन्नानूरी यांच्या 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा आगामी 'जर्सी' सिनेमाच्या चंदीगढमधल्या शूटिंग शेड्यूल दरम्यान निर्मात्यांना शेतकरी आंदोलनामुळे रोडब्लॉकचा सामना करावा लागला.  कसौली आणि देहरादूनला जाण्यापूर्वी 'जर्सी'च्या टीमला उत्तर भारतीय शहरात या स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाच्या मुख्य भागांचे शूटिंग करायचे होते. 

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, चंदीगडमध्ये सिनेमाचे काही दिवसांचे शूट बाकी आहे. निर्मात्यांना असे वाटते की, चंदिगडमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सध्याच्या परिस्थितीत सिनेमाचे उर्वरित शूटिंग पूर्ण करणे खूप कठीण जाईल. या कारणामुळे टीमने आपला प्लान चेंज आणि गेल्या आठवड्यातच देहरादून गाठले.

आता देहरादूनला होणार जर्सीचे शूटिंग रिपोर्टनुसार, शाहिद, मृणाल ठाकूर आणि सिनेमाची संपूर्ण कास्ट येत्या काही दिवसांत उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये 'जर्सी' काही भागांचे शूटिंग करणार आहे. त्यानंतर शेड्यूलच्या शेवटच्या टप्प्यात ते चंदीगडला परत येतील. सिनेमाचे  जवळपास तीन दिवसांचे शूटिंग बाकी आहेत.

दिग्दर्शक गौमत टिन्नानूरी यांच्या 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात शाहिदच्या वडिलांची भूमिका पंकज कपूर दिसणार आहे. हा सिनेमा तेलगू भाषेत प्रदर्शित झालेल्या 'जर्सी'चा हिंदी रीमेक आहे. तेलगू सिनेमा नवीन बाबू घंटा उर्फ नानी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल अद्याप काहीही खुलासा झाला नाही.

टॅग्स :शाहिद कपूर