Join us  

शोलेतील सांबाच्या पावलावर पाऊल टाकून मुली करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, पाहा त्यांच्या कुटुंबियांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 6:00 AM

मॅक मोहन यांना दोन मुली आणि एक मुलगा असून त्यांचे कुटुंबिय मुंबईत राहातं.

ठळक मुद्देमंजरी आणि विनती या दोघींनी मिळून देशातील पहिला स्केटबोर्डिंगवर आधारित चित्रपट बनण्याचा निर्णय घेतला आहे.

शोले या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटात आपल्याला सांबाच्या भूमिकेत मॅक मोहन यांना पाहायला मिळाले होते. मॅक मोहन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तरीही प्रेक्षक आजही त्यांना सांबा म्हणूनच ओळखतात. 

अभिनेते मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन यांचे निधन मे 2010 मध्ये झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून त्यांचे कुटुंबिय मुंबईत राहातं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मंजिरी आणि विनती दोघीही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाल्या आहेत. मंजरी आणि विनती या दोघींनी मिळून देशातील पहिला स्केटबोर्डिंगवर आधारित चित्रपट बनण्याचा निर्णय घेतला आहे. मंजिरी ही लेखिका, दिग्दर्शिक असून तिच्या शॉर्ट फिल्मना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मंजिरीने क्रिस्टोफर नोलन आणि पेंटी जेंकिंस या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. यांच्यासोबत तिने डंकर्क, द डार्क नाइट राइजेस आणि वंडर वूमेन आदी चित्रपटांसाठी काम केले. याशिवाय टॉम क्रूजच्या मिशन इम्पॉसिबल गोस्ट प्रोटोकॉल, वेक अप सिड आणि विशाल भारद्वाज यांच्या सात खून माफ या चित्रपटातही तिचे योगदान आहे.

तीन शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्यानंतर एक दिग्दर्शिका म्हणून नावारूपास आलेली मंजिरी आता आपल्या बहीणीसोबत म्हणजेच विनतीसोबत बॉलिवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट दिग्दशिृत करणार आहे. विनती हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. ‘डेजर्ट डॉलफिन’ नामक या चित्रपटात राजस्थानच्या एका गावात राहणाऱ्या प्रेरणा नामक मुलीची कथा रेखाटण्यात येणार आहे. ही मुलगी ३४ वर्षांची ग्राफिक आर्टिस्ट जेसिकाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून स्केटबोर्डिंग करण्याचे स्वप्न पाहते. तूर्तास या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. 

टॅग्स :मॅक मोहन