Shocking! उर्वशी रौतेलाच्या नावे पंचतारांकित हॉटेलात रूम बुक करण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 11:48 IST
बनावट आधार कार्डच्या आधारे अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्या नावे, मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात रूम बुक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण ...
Shocking! उर्वशी रौतेलाच्या नावे पंचतारांकित हॉटेलात रूम बुक करण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर!!
बनावट आधार कार्डच्या आधारे अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्या नावे, मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात रूम बुक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. होय, उर्वशीने याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी साडे दहाच्या सुमारास उर्वशी एका इव्हेंटसाठी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात पोहोचली. याठिकाणी पोहोचताच, हॉटेलच्या कर्मचाºयांनी तिला तिच्या नावावर हॉटेलातील एक रूम आॅनलाईन बुक करण्यात आल्याचे सांगितले. हे ऐकून उर्वशीला धक्का बसला. कारण तिने वा तिच्या टीमने अशी कुठलीही बुकिंग केलेली नव्हती. यानंतर तिने लगेच हॉटेलचे बुकिंग डिटेल्स तपासले आणि तिला दुसरा धक्का बसला. कारण या बुकिंगसाठी उर्वशीचे बनावट आधार कार्ड वापरण्यात आले होते. हा सगळा प्रकार उर्वशीसाठी धक्कादायक होता. तिने लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ४२० अंतर्गत आयटी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. एका पोलिस अधिकाºयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही बुकिंग कुठून केली गेली, यासाठी आयपी अॅड्रेसचा रेकॉर्ड तपासला जाईल, असे या अधिका-याने सांगितले. ALSO READ : उर्वशी रौतेलाने सनी देओलविषयी केला ‘हा’ दावा; मात्र व्हिडीओने केली पोलखोल!अलीकडे उर्वशीचा ‘हेटस्टोरी4’ हा चित्रपट रिलीज झाला. पण तिच्या या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. उर्वशी रौतेला ही बी-टाऊनमधील एक हॉटेस्ट अभिनेत्री आहे. सनी देओलच्या ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर ‘भाग जॉनी’, ‘सनम रे’ या चित्रपटांमध्ये उर्वशी दिसली. यानंतर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये उर्वशी सेक्सी अवतारात चाहत्यांसमोर आली. अर्थात हा अॅडल्ट कॉमेडी चित्रपट बॉक्सआॅफिसवर अपयशी ठरला.