Join us  

Shocking! प्रियंका चोप्रासमवेत काही सेलिब्रेटींचा खासगी डेटा झाला हॅक, सेलिब्रेटींमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:30 AM

जवळपास 756 जीबीची माहिती चोरी झाली आहे. या सायबर अटॅकमुळे सेलिब्रिटींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

अमेरिकेतील एका प्रतिष्ठीत मीडिया आणि एण्टरटेन्मेंट फर्ममधून प्रियंका चोप्रा, लेडी गागा, मैडोना, निकी मिनाज व ब्रुस प्रिरंगस्टीन यांसारख्या बऱ्याच सेलिब्रेटींचा खासगी डेटा चोरीला गेला आहे. काही अज्ञात हॅकर्सने सेलिब्रिटींचे फोन, इमेल आयडी, सोशल मीडिया अकाउंट, फोन रेकॉर्ड्स हॅक करुन त्यांची संपूर्ण माहिती चोरी केली आहे. Variety.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार जवळपास 756 जीबीची माहिती चोरी झाली आहे. या सायबर अटॅकमुळे हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेतील सायबर सुरक्षा विभाग या हल्ल्याचा तपास करत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हॅकर्सने रॅन्समवेअर व्हायरसचा वापर केला आहे. तसेच त्यांनी दोन कोटी १० लाख अमेरिकी डॉलर्सची मागणी केली आहे. जर हे पैसे लवकरात लवकर त्यांना मिळाले नाही तर सेलिब्रिटींची सर्व माहिती डार्क वेबवर व्हायरल केली जाईल अशी धमकी देखील या हॅकर्सने दिली आहे.

इंटरनेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. तीन वर्षांपूर्वी रॅन्समवेअरचाच वापर करुन अमेरिकेतील रुग्णालयांवर सायबर अटॅक करण्यात आला होता. त्यानंतर होणारा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

सायबर हल्ला झालेल्या मीाडिया कंपनीचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. कारण ही कंपनी डिस्कव्हरी, ईएमआय म्यूझिक ग्रुप, फेसबुक, एचबीओ, आयमॅक्स, एमटीवी, एनबीए एंटरटेनमेंट, प्लेबॉय एंटरप्राइजेज, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सोनी क्रॉप, स्पोटीफाई, ट्रिबेका फिल्म फेस्टिवल, यूनीवर्सल म्यूझिक ग्रुप यांसारख्या अनेक नामाकिंत कंपन्यांसाठी काम करते. त्यांचीदेखील माहिती चोरीला गेली आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रासायबर क्राइम