Join us  

प्रतिक बब्बरची पत्नी सान्या सागरने त्यांच्या नात्यावर दिली ही पहिली प्रतिक्रीया, घटस्फोटाचे दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 11:34 AM

या दोघांचे नाते तुटण्यामागे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी वर्षभरातच यांचे नाते घटस्फोटावर पूर्णविराम घेणार असेच सध्या चित्र आहे.

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. याच यादीत आता राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याचाही समावेश होणार आहे. कारण यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

 

 

प्रतीकने 23 जानेवारी 2019 रोजी सान्या सागरसोबत लग्न केले होते, मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण  कळू शकलेले नाही. 

दोघेही ब-याच दिवसांपासून वेगळे राहत आहे. बब्बर कुटंबाच्या कोणत्याची फॅमिली फंक्शनमध्ये सान्या दिसली नव्हती. तसेच वर्षभरातच हे कपल वेगळे होणार न्यासाची अनुपस्थिती प्रतिकचे वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळाचे संकेतच देत होते. नेहमीत सोशल मीडियावर अक्टीव्ह असणा-या कपलने काही दिवसांपूर्वीच एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. इतकेच नाही तर प्रतीकने सान्यासोबतची रोमँटिक फोटोदेखील डिलीट केली आहेत. अद्याप दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या नात्यात कटुता आल्याचे कबुल केलेले नाही.

 

 

या दोघांच्या नात्यात आलेली कटुता जाणून घेण्यासाठी स्पॉटबॉयने सान्याशी थेट संपर्क साधला होता. यावर सान्या भडकली आणि हा माझा खाजगी विषय आहे यावर मी सध्या काहीही बोलु शकत नाही असे सांगत चांगलेच खडेबोलदेखील सुनावले.  मुळात माझा फोन नं तुम्हाला कुठून मिळाला? यावर तुम्हाला मी अधिक माहिती देणे गरजेचे समजत नाही. तसेच काही दिवसांपूर्वी प्रतीकला देखील असाच प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा प्रतिकनेही यावर बोलणे टाळले होते. सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपल्या प्रेमाची खुल्लम खुल्ला कबुली देणारे हे कपल आज एकमेकांचे चेहरे देखील पाहणे पसंत करत नाहीत. या दोघांचे नाते तुटण्यामागे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी वर्षभरातच यांचे नाते घटस्फोटावर पूर्णविराम घेणार असेच सध्या चित्र आहे.

 

 

टॅग्स :प्रतीक बब्बर