Join us  

Shocking: लग्नाच्या अवघ्या महिन्यातच सुष्मिता सेनच्या भावाचा संसार धोक्यात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 4:25 PM

चारू आणि राजीवने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. इतके नाही तर दोघांनी आपापले प्रोफाईल फोटोही बदलले असून सिंगल फोटो ठेवले आहेत.

चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण. आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही.  इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात. 

असं काहीसं  सुष्मिता सेनच्या भावाबरोबर घडले आहे. सुष्मिताचा भाऊ राजीव सेनने टीव्ही अभिनेत्री चारु असोपासह  16 जून 2019 लग्न केले होते. गोव्यात काही जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न पार पडले. सुश्मिता सेनच्या कुटुंबानं नववधू चारूचा बंगाली पद्धतीनं गृह प्रवेश केला होता.

 

सुश्मिताच्या आईनं तिची आरती केली आणि प्रेमानं आपल्या सुनेचा गृहप्रवेश केला होता. लग्नातल्या स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले होते.राजीव आणि चारूने  प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असल्याची पोस्ट शेअर केली होती. मात्र यांच्या

 

लग्नाला महिनाही पूर्ण झाला नाही तेवढ्यात राजीव आणि चारू दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा आहे. चारू आणि राजीवने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. इतके नाही तर दोघांनी आपापले प्रोफाईल फोटोही बदलले असून सिंगल फोटो ठेवले आहेत. 

चारू आणि राजीव त्यांच्या हनीमूनचे रोमँटिक फोटोही  सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यातील एका फोटोत ते लिपलॉक करताना दिसले होते.हनीमूनच्या या फोटोत चारू आणि राजीव पूलमध्ये एन्जॉय करताना दिसले. जीव व चारू रोमँटिक पद्धतीनं एकमेकांसोबत लिप लॉक करताना दिसले. राजीवने हनीमून फोटो शेअर करून कॅप्शन दिलं की, लव पॅशनेटली. या फोटोत चारू पूलमध्ये बिकनीमध्ये बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली होती. 

टॅग्स :सुश्मिता सेन