Join us  

Shocking: भारतात Coronavirus ची लागण झाल्यामुळे खुश आहे ही अभिनेत्री, असा जाहीर केला तिने आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 3:02 PM

हा व्हीडीओ पाहताच नटीझन्सनेही तिच्यावर चांगलाच निशाणा साधत तिला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

देवा ऐकावे ते नवलच.सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस आता भारतातमध्ये पसरत असल्यामुळे सगळ्यांनीच त्याची धास्ती घेतली आहे. जागोजागी व्हायरस पासून बचाव कसा करता येईल याच्या सुचना प्रसारित केल्या जात आहे. तर बॉलिवूडमधील कालाकार मंडळी देखील कशी खबरदारी घेता येईल याचे आवाहन करताना दिसत असून स्वतःही मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. एकीकडे कोरोनामुळे जनता हैराण आहे तर दुसरीकडे एक अभिनेत्री मात्र याचा आनंद साजरा करत आहे,

वाचून तुम्हालाही थोडे आश्चर्य वाटलेच असणार. यावर आनंद जाहीर करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे लोकप्रिय तेलगू अभिनेत्री चार्मी कौर. चार्मी ही अभियातच नाही तर निर्माती म्हणूनही तिने आपले स्थान निर्माण केेल आहे. नुकतेच चार्मीने टीक टॉक व्हीडीओ शेअर केला आहे. यात ती कोरोना संदर्भात बोलताना पाहायला मिळत आहे. हा व्हीडीओ पाहताच नटीझन्सनेही तिच्यावर चांगलाच निशाणा साधत तिला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

या व्हीडीओनंतर तिच्या चांगलीच टीकेची झोड उठल्यामुळे तिने नंतर सगळ्यांची माफी देखील मागितली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या