Join us

Shocking : ‘बाहुबली’मधील ‘या’ अभिनेत्याच्या भावानेच केले श्री रेड्डीचे शोषण; लीक केले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 19:29 IST

तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने नुकतेच कास्टिंग काउचविरोधात भररस्त्यात अर्धनग्न आंदोलन करून खळबळ उडवून दिली होती. तिच्या या विचित्र ...

तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने नुकतेच कास्टिंग काउचविरोधात भररस्त्यात अर्धनग्न आंदोलन करून खळबळ उडवून दिली होती. तिच्या या विचित्र आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी तिला तत्काळ अटक करीत अश्लीलता पसरविण्याच्या आरोपावरून तिच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यानंतर श्रीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘एका प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाने माझ्यावर स्टुडिओमध्येच त्याच्याशी सेक्स करण्यासाठी दबाव टाकला होता. मी लवकरच याचा पुरावा देणार आहे.’ आता श्रीने काही फोटोज् लीक केले असून, त्या निर्मात्याचे नाव सुरेश बाबू असल्याचे सांगितले आहे. सुरेश बाबूचा मुलगा अभिराम दग्गुबत्तीने माझ्याशी स्टुडिओमध्ये सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्रीने केला आहे. श्रीने जे फोटो लीक केले आहेत, त्यामध्ये अभिराम तिच्याशी अंगलट करीत असल्याचे स्पष्ट दिसते. श्रीने म्हटले की, अभिराम तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज करणाºया एका मोठ्या निर्मात्याचा मुलगा आहे. त्यामुळेच तो वाट्टेल ते करू शकतो. अभिराम तेलगू चित्रपटांचे निर्माते सुरेश बाबूचा मुलगा आणि राणा दग्गुबत्तीचा भाऊ आहे. राणाने ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारली होती. अभिरामची आजी रामानायडू यादेखील तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्मात्या राहिल्या आहेत. श्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, एका प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाने स्टुडिओमध्येच त्याच्याशी सेक्स करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. हा स्टुडिओ पब्लिक प्रॉपर्टीवर उभा आहे. माझा प्रश्न आहे की, सरकार अशा लोकांना प्रॉपर्टी का देते? श्रीच्या मते, तो मला स्टुडिओमध्ये येण्यास म्हणत होता. त्यावर मी त्याला म्हणत होती की, मी केवळ बोलण्यासाठी येणार, कुठलेही चुकीचे काम करणार नाही. मात्र त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्याने माझ्यावर सेक्स करण्यासाठी दबाव टाकला. दरम्यान, त्या स्टुडिओचा वापर केवळ आणि केवळ सेक्स करण्यासाठी केला जातो. मोठमोठे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते या स्टुडिओचा वापर शारीरिक संबंधांसाठी करतात. परंतु याठिकाणी कधीच पोलिसांनी छापा टाकला नाही. हा स्टुडिओ शारीरिक संबंधांसाठी खूपच सुरक्षित समजला जातो. दरम्यान, श्री रेड्डीने गेल्या शनिवारी बंजारा हिल्स येथील फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सच्या आॅफिससमोर अर्धनग्न होऊन आंदोलन केले होते. श्री रेड्डीने आरोप केला होता की, बºयाचसे निर्माते आणि दिग्दर्शकांनी माझे लैंगिक शोषण केले.